काेल्हापूर -प्रवीण भोसले
दि.२७ : उद्याेजकीय दूरदृष्टी, ग्राहकांचा विश्वास आणि टीमच्या सामूहिक प्रयत्नांच्या बळावर दत्तवाडे ग्रुपने तीन वर्षांच्या यशस्वी वाटचालीत महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. दत्तवाडे ऑटाेमाेटिव्हज आणि दत्तवाडे इंजिनिअरिंग एंटरप्रायजेस यांच्या संयुक्त ाउंडेशन डे साेहळ्यानिमित्त ग्रुपने आगामी २०२७ ते २०३० या कालावधीसाठीचा महत्त्वाकांक्षी ‘व्हिजन २०३०’ जाहीर केला. पाच ब्रँड डीलरशिपच्या माध्यमातून २०३० पर्यंत वर्षाला १० हजार वाहनांची विक्री व डिलिव्हरी करण्याचे उद्दिष्ट या व्हिजनमध्ये निश्चित करण्यात आले असून, यामध्ये दाेन नवीन ब्रँड्सचा समावेश करण्यात येणार आहे.
या तीन वर्षांच्या कालावधीत दत्तवाडे ग्रुपने २८०० हून अधिक वाहनांची विक्री व डिलिव्हरी, तसेच १२ हजारांहून अधिक वाहनांची सर्व्हिसिंग पूर्ण केली आहे. या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी आयाेजित ाउंडेशन डे साेहळ्यात ४० हून अधिक टीम सदस्यांनी उत्स्ूर्त सहभाग नाेंदविला. संपूर्ण कार्यक्रम उत्साह, ऊर्जा, प्रेरणा आणि सांघिक भावनेने भारलेला हाेता. कार्यक्रमात मागील तीन वर्षांतील कामगिरीचा आढावा, प्रमुख टप्प्यांचे सादरीकरण, मार्गदर्शनपर सत्र, आगामी धाेरणात्मक दिशा, पुरस्कार व गाैरव, उद्याेजकीय अनुभवांची देवाणघेवाण, स्नेहभाेजन आणि विविध सांघिक उपक्रमांचे आयाेजन करण्यात आले हाेते. दिवसभर चाललेल्या या कार्यक्रमात टीममधील उत्साह आणि एकजुटीचे दर्शन घडले.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले ते आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व लाइफ काेच सुरेश श्रीनिवासन यांचे विशेष मार्गदर्शन. त्यांच्या ९० मिनिटांच्या अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी सत्राने उपस्थित संपूर्ण टीममध्ये नवचैतन्य निर्माण केले. सकारात्मक दृष्टिकाेन, आत्मविश्वास आणि ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेचा संदेश देणाèया या सत्रामुळे ‘व्हिजन २०३०’ साकार करण्यासाठी टीम नव्या जाेमाने सज्ज झाली.
दत्तवाडे ग्रुपचे द्वितीय पिढीतील नेतृत्व आणि या भक्कम पायाचे आधारस्तंभ प्रकाश दत्तवाडे यांनी स्वागत केले. तर प्रास्ताविकात संस्थापक सुमित दत्तवाडे यांनी ग्रुपच्या स्थापनेपासूनच्या आठवणींना उजाळा देत संघर्ष, आव्हाने, अनुभव आणि यशाच्या टप्प्यांचा प्रवास टीमसमाेर उलगडला. तीन वर्षांच्या या वाटचालीतील प्रत्येक यशाचे संपूर्ण श्रेय त्यांनी टीमला दिले. काेणत्याही संस्थेच्या प्रगतीमागे तिची माणसे हीच खरी ताकद असतात, हे अधाेरेखित करत त्यांनी सध्याची टीम आणि भविष्यात नव्याने सहभागी हाेणारे सहकारी यांच्या सामूहिक प्रयत्नांतून ‘व्हिजन २०३०’ निश्चितपणे साकार हाेईल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
तीन वर्षांपूर्वी सुरू झालेला हा प्रवास आज एका महत्त्वाकांक्षी विस्ताराच्या दिशेने वाटचाल करत आहे. केवळ व्यावसायिक उलाढाल वाढविणे नव्हे, तर सक्षम टीम, ग्राहकांचा विश्वास आणि उत्कृष्ट सेवा यांच्या बळावर एक भक्कम व्यावसायिक समूह उभारण्याचा दत्तवाडे ग्रुपचा संकल्प या ाउंडेशन डेच्या माध्यमातून अधाेरेखित झाला.