ईस्ट मँचेस्टर होम्स मध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

इचलकरंजी : विजय मेकोटे

दि. १७ ऑगस्ट :भारत देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सांगली रोडवरील ईस्ट मॅचेस्टर होम्स या हौसिंग कॉलनीमध्ये कोरोना महामारीच्या काळामध्ये अतिशय चांगले कार्य करून कोरोना योध्दा म्हणून ज्यांचा गौरव झाला असे डॉ. प्रशांतजी पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन संपन्न झाले. तसेच एस. बी नवले यांचे माध्यमातून बाबूभाई देव पटेल, विनोद काबरा, अ‍ॅड. दिग्वीजय पाटील याचे प्रयत्नातून संपन्न झालेल्या कार्यक्रमात स्वातंत्र सैनिकाचा कॉलनीतील कुटुंबिय अरुणराव पाटील, निशिकांत मगदूम यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे प्रशांत पाटील यांनी आपण सर्वजण जाती-भेद विसरून स्वातंत्र्याचा उपभोग घेत राहू. पण त्याचा अतिरेक करू नये, असे सांगितले. प्रकाशराव सातपुते यांनी, स्वातंत्र टिकवण्यासाठी आपण एकोप्याने राहुया, असे मनोगत व्यक्त केले. तसेच पुंडलिकभाऊ जाधव यांनी, स्वातंत्रतं लढ्यातील अनेक वर्षाचा आढावा घेत सध्याच्या कालखंडामध्ये देशप्रेम जागृत ठेवावे असे आवाहन केले.
अमृत महोत्सवा निमित्त कॉलनीतील 175 घरावर ’हर-घर तिरंगा’ उपक्रमांतगत तीन दिवस तिरंगा ध्वज फडकवित ठेवून देशाला मानवंदना दिली. कार्यक्रमास संचालक संजय राऊत व अनिल पोवार, दिपक गायकवाड, महेश झंवर, अमित दोशी, भरत तमायचे, अमित चौगुले, बलराम सारडा, राहुल सातपुते तसेच महिलांमध्ये सौ. चौगुले, सौ. पुजारी, सौ. नवले, सौ. पाटील, सौ. जैन, सौ. पटेल, सौ. इनामदार त्याचबरोबर विजय पित्रोदा, जाधव, पाटील, अमोल सातपुते, श्री. पुजारी, दायमा, तिवारी, जाधव, माने, व्यास, घाटगे, अग्रवाल यांच्यासह अनेक रहिवाशी बंधु-भगिनी मोठ्या संख्येने हजर होते. या कार्यक्रमास रोटरी आर. सी. सी. क्लब ऑफ ईस्ट मॅचेस्टर होम्स (ग्रामिण रोटरी) चे सहकार्य लाभले.