श्री.डी.ए.मणेरे शिक्षण संकुलात स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात  साजरा

कबनूर : हबीब शेख दर्जी

दि. १६ ऑगस्ट :श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित, सौ.कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्या मंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आज विद्यालयाच्या प्रांगणात  स्वातंत्र्य दिनाचा ७५ वा अमृत महोत्सव देशभरात मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या शुभ हस्ते ध्वजपूजन व ध्वजारोहण करुन झाली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून मा.श्रीमती मंगल माने (निवृत्त मुख्याध्यापिका व्यंकटराव हायस्कूल इचलकरंजी) उपस्थित होत्या.तर अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकरराव मणेरे होते.  तसेच संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.सुभाष केटकाळे, संस्थेचे मार्गदर्शक मा.श्री.संजय देशपांडे व  मा.श्री.हर्षल माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रमुख पाहुण्या मा.श्रीमती मंगल माने यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या . त्यांनी आपल्या मनोगतामध्ये “शाळेच्या उज्वल प्रगती विषयी व भारताच्या स्वातंत्र्याची उभारणी देशासाठी रक्त सांडलेल्या नेत्यांच्या बलिदानावर झाली आहे. आजही देशाचे वीर जवान भारतमातेच्या रक्षणासाठी सीमेवर तटस्थपणे लढत आहेत याची जाणीव आपण सर्वांनी राखली पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनीही  आपल्या परीने देशाच्या विकासासाठी आपला खारीचा वाटा द्यावा व त्यासाठी प्रयत्नशील रहावे”, असे  आपले मत व्यक्त केले.

संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकरराव मणेरे यांनी सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

या स्वातंत्र्यदिनाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून विद्यालयात विविध स्पर्धा, झांज, कराटे लोककला प्रात्यक्षिक, रांगोळी, चित्रकला प्रदर्शन याचे आयोजन करण्यात आले. यावेळी  कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी  “हर घर तिरंगा” याविषयीचे पथनाट्य सादर केले. त्याचप्रमाणे इंटीलेक्ट  टॅलेंट सर्च परीक्षेत यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा व विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.प्रेमा कांबळे, पाहुण्यांची ओळख व प्रास्ताविक कु.संगीता कुंभार व  आभार सौ.सुमन पाटील यांनी केले. यावेळी हायस्कूल व कॉलेज प्राचार्या सौ. उर्मिला माने, प्राथमिक मुख्याध्यापिका कु.तसलिम मणेर, बालवाडी विभाग प्रमुख सौ.स्वाती ढेकळे, कॉलेज इनचार्ज,  विभाग प्रमुख, शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी  व पालक  उपस्थित होते.