कोतवडे ग्रामपंचायत तर्फे विद्यार्थ्यांना गणवेश वाटप

रत्नागिरी : अस्लम खान

दि. २२ ऑगस्ट :  कोतवडे गावातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ग्रुप ग्रामपंचायत कोतवडे तर्फे शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ग्रामपंचायत कोतवडे तर्फे गावातील एकूण आठ प्राथमिक शाळेतील ज्या विद्यार्थ्यांना शासनाकडून गणवेश मिळाले नाहीत अशा एकूण 73 विद्यार्थ्यांना शालेय गणवेश देण्यात आले.त्या मद्धे शर्ट, पॅन्ट , टाय व बेल्ट चा समावेश आहे.
कोतवडे गावातील पालक वर्ग, ग्रामस्थ व शिक्षकांच्या मागणी नुसार ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रातील जि.प. प्राथमिक शाळा उंबरवाडी, जि.प.प्राथमिक शाळा मुस्लिमवाडी,जि.प. प्राथमिक शाळा धामेळेवाडी, जि.प. प्राथमिक शाळा वारे – ढोकमळे, जि. प. प्राथमिक शाळा गावणवाडी,  जि. प. प्राथमिक शाळा कुंभारवाडा,  जि. प. प्राथमिक शाळा घारपुरीवाडी,  जि. प. प्राथमिक शाळा कोतवडे क्र-1 (बाजारपेठ) या आठ शाळेतील शासनाकडून गणवेश प्राप्त न झालेल्या 73 विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतीच्या कार्यकारिणीने एकमुखी निर्णय घेत गणवेश वाटप केले आहेत.
भारताच्या 75 वा स्वातंत्र्य दिन गावातील सर्व विद्यार्थ्यांनी गणवेशामध्ये साजरा करावा असा ग्रामपंचायतीचा मानस होता. आणि ग्रामपंचायतीने तो अशा प्रकारे पूर्ण ही केला आहे.ही बाब कौतुकास्पद आहे.
ग्रामपंचायत कोतवडे च्या विकास कामाबाबत अशा सकारात्मक भूमिकेमुळे पालक वर्ग व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.