कबनूर : चंदूलाल फकीर
दि. २२ ऑगस्ट :आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून कबनुर ते अतिग्रे फाटा रस्ता रुंदीकरणासह 3.88 कोटी मंजूर झालेल्या कामाचा शुभारंभ व उद्घाटन सोहळा आमदार प्रकाशआण्णा आवाडे व जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाला. येथील ग्रामदैवत हजरत पीर जंदीसो व ब्रॉनसो यांचे दर्शन घेवून येथील देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार चौक येथे या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी सुधाकर मणेरे (मामा), पंचगंगा साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम.पाटील, जवाहर बँकेचे संचालक बबन केटकाळे, मा उपसरपंच निलेश पाटील कबनूर सरपंच शोभा पोवार, माजी जिल्हा परिषद सदस्या विजया पाटील, माजी पंचायत समिती सदस्या महानंदा कांबळे, उपसरपंच सुधीर पाटील, माजी सरपंच मधुकर मणेरे, ग्रा.पं.सदस्य सर्वश्री सुधीर लिगाडे, सुनिता आडके, समीर जमादार, स्वाती काडाप्पा, वैशाली कदम, रजनी गुरव, रोहिणी स्वामी, अर्चना पाटील, सैफ मुजावर, सुलोचना कट्टी, सुनील काडाप्पा, प्रविण जाधव, सुधाराणी पाटील आदी ग्रामपंचायत सदस्य बी.डी.पाटील, अशोक पाटील, मिलिंद कोले, मनोहर मणेरे, रावसो खवरे, शिवगोडा पाटील, अनिल पाटील, जयकुमार काडाप्पा, अजित खुडे, शकील मुल्ला, हुसेन मुजावर, जंबा पाटील, दादा पाटील, बी.एस.पाटील, सतिश परीट, प्रज्योत चौगुले, सागर चराट्टी, किरण परीट यांच्यासह आवाडे समर्थक व कबनूर ग्रामस्थ उपस्थित होते.
Post Views: 384