शरद इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांची एब्लो बॉक्सिंग मध्ये बाजी.

यड्राव : विजय मकोटे

दि.27 यड्राव येथील शरद इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी जिल्हा पातळीवर घेण्यात आलेल्या एब्लो बॉक्सिंग स्पर्धेत बाजी मारत पहिल्या तीन क्रमांकाचे मानकरी ठरले.

निर्मिती कोष्टी हिने 9 वर्ष वयोगटामध्ये प्रथम क्रमांक,निशांत कोष्टी याने 10 वर्ष वयोगटात द्वितीय क्रमांक तर सिद्धेश गरड याने 12 वर्ष वयोगटात तृतीय क्रमांक पटकाविला.

या विद्यार्थ्यांची राज्य पातळीवरील निवड चाचणीकरिता सहभाग घेता येणार आहे. यशस्वी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका सौ. कानिज कोतवाल, क्रीडा शिक्षक संदीप पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.