यड्राव : विजय घंगेकर
दि.3१ यड्राव येथील शरद इन्स्टिट्युट ऑफ टेक्ऩॉलॉजी, पॉलिटेक्ऩिकला नवी दिल्ली येथील इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) कडून ‘बेस्ट फॅकल्टी चार्प्टर’ अॅवार्ड नुकताच प्रदान करण्यात आला. गोवा येथील अग्नेल इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड डिझाईन कॉलेजमध्ये झालेल्या 51 व्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशनच्या (ISTE) राष्ट्रीय अधिवेशनात एन.बी.ए.चे चेअरमन डॉ. के.के. अग्रवाल यांच्या हस्ते शरद पॉलिटेक्निकचे प्राचार्य बी.एस. ताशीलदार यांनी स्विकारला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, आय.एस.टी.ईचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, एक्झिक्युटीव्ह सेक्रेटरी प्रा. विजय वैद्य उपस्थीत होते.
यावेळी शरद पॉलिटेक्निकमधील इलेक्ट्रीकल विभाग प्रमुख प्रा. चेतन रावळ यांना ‘बेस्ट फॅकल्टी फॉर एक्सलंट कॉन्ट्र्युबिशन इन आएसटीई अॅक्टीव्हीटी’ तर डिन प्रा. प्रविण थोरात यांना ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह प्रोजेक्ट’ पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. सांवत म्हणाले, देशामध्ये तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणातील विकासामध्ये आय.एस.टी.ई.चा महत्वाचा वाटा आहे. नवीन अभियंताना या व्यासपीठाच्या माध्यमातून संधी मिळत आहे. डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी, गोवा यांच्याकडून राज्यात तंत्रशिक्षण क्षेत्रात विविध योजना राबविले जात आहेत.
डॉ. अग्रवाल म्हणाले, बहुविद्याशाखीय शिक्षणासाठी आपण देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आमंलात आणत आहोत. त्यासाठी व गुणांवत्तापूर्ण अभियंता निर्माण करण्यासाठी संस्था स्वायत्त व्हायला हवीत. त्यानंतर देशाला कौशल्यपूर्ण अभियंते मिळतील आणि देशाला विकसित करतील.
श्री. देसाई म्हणाले, देशातील 2740 संस्था, 1 लाख 28 हजार शिक्षक व साडेपाच लाख विद्यार्थी आय.एस.टी.ई.शी जोडलेले आहेत. तांत्रिक शिक्षणामध्ये गुणवत्ता निर्माण करणे हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे.
शरद पॉलिटेक्निकने फॅकल्टी डेव्हलेपमेंट प्रोग्रॅम, इंडक्शन प्रोग्रॅम, प्रशिक्षण कार्यशाळा, प्रोजेक्ट स्पर्धा, पेपर प्रेझेंटेशन, क्विझ कॉम्पीटेशन असे विविध उपक्रम राबविले आहेत. त्याचबरोबर प्रा. रावळ यांनी इलेक्ट्रील विभागामध्ये विविध अॅक्टीव्हीटी राबविल्या आहेत. प्रा. थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ‘सोलर बेसड व्हॅक्सीन स्टोरेज सिस्टीम’ हा प्रोजेक्ट विद्यार्थ्यांनी केला आहे.
शरद पॉलिटेक्निकमधील सर्व विभागांना एन.बी.ए.चे मानांकन मिळाले आहे. तसेच यापूर्वी आय.एस.टी.ई.(ISTE) कडून एन.बी.ए अचिव्हमेंट अवार्डने गौरविण्यात आले आहे. या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटीव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.