कबनूर : चंदूलाल फकीर
दि. ३१ ऑगस्ट: येथील ग्रामपंचायत कार्यालयात गावातील आदिवासी समाजाच्या एका होतकरू कुटुंबाकडून सर्वांचे आराध्य दैवत गणराय मूर्तीची प्रतिष्ठापणा सानंद पूर्वक करण्यात आले. यावर्षी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. गेली सात वर्षे झाली ही परंपरा चालू आहे. स्वामी विवेकानंद चौक येथून श्रीची वाजत गाजत मिरवणुकीने ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आली. तदनंतर आदिवासी समाजातील सौ चित्रकला कृष्णा गांगुर्डे व कृष्णा सुखदेव गांगुर्डे या उभयतांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.
तर सरपंच शोभा पोवार व शंकर पोवार यांच्या हस्ते श्रींची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी उपसरपंच सुधीर पाटील ग्रा.प. सुनील काडाप्पा सुधीर लिगाडे, भैया जाधव सामाजिक कार्यकर्ते शिवानंद स्वामी किशोर पाटील संजय कट्टी शंकर सुतार जावेद मुजावर तसेच ग्रा.प.कर्मचारी अमित चंदुरे महेश पाटील विनायक इंगवले लक्ष्मण चव्हाण सुरज शिंगे अण्णाप्पा वड्डर, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य नागरिक व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.