इचलकरंजी : विजय मकोटे
दि. ४ सप्टेंबर 2022 – रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लबच्या वतीने शिक्षक दिना निमित्त क्लबच्या शिक्षक सभासदांचा सत्कार गजाननराव सुलतानपुरे यांच्या हस्ते व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
5 सप्टेंबर या शिक्षक दिनाचे औचित्य साधत क्लबचे शिक्षक सभासद रामचंद्र निमणकर, प्रतापराव जाधव, ए. आर. पाटील, सौ. शारदा कवठे, सौ. शकुंतला जाधव, सौ. सुनिता जोशी, योगशिक्षिका सौ. सुजाता कोईक, योगशिक्षक विजय पवार व सुनिल परीट यांचा सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. आपल्या मनोगतामध्ये सत्कारमूर्ती शिक्षकांनी रोटरी प्रोबसचे आभार मानले आणि आजच्या गतिमान युगात मोबाईल आणि टीव्ही यामागे न लागता आपली संस्कृती जपणे आवश्यक आहे, अशा भावना व्यक्त केल्या. प्रमुख पाहुणे गजाननराव सुलतानपूरे यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये आजची शिक्षण पद्धती आणि पारंपारिक गुरुकुल पद्धती यामधील फरक सांगत भारत शैक्षणिक विश्वगुरू आहे म्हणून आपण आपल्या संस्कृतीचा, देशाचा, गुरुजनांचा आदर करणे, त्यांचे मार्गदर्शनाच्या माध्यमातून वाटचाल करणे ही काळाची गरज आहे असे सांगितले. रोटरी प्रोबसने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सत्कार करून प्रोबस क्लब हा सर्वच क्षेत्रात मध्ये काम करत आहे याचा आम्हास अभिमान आहे, अशा भावना व्यक्त केल्या.
रोटरी प्रोबस क्लबचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी, क्लबच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबवित असताना शिक्षकांचा सत्कार हा क्लबच्या दृष्टीने बहुमान आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये क्लब वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवित राहील असे सांगितले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत क्लबच्या अध्यक्ष सौ. प्राजक्ता होगाडे यांनी केले. उपाध्यक्ष शिवबसू खोत यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रास्ताविक क्लबचे सेक्रेटरी सुनिल कोष्टी यांनी देतानाच प्रोबसच्या कामाचा आढावा घेतला. आभाराचे कार्य सौ. अरुंधती सातपुते यांनी पार पाडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ प्रमोदिनी देशमाने यांनी केले. प्रमुख पाहुणे गजाननराव सुलतानपूरे यांचा सत्कार शिवाबसू खोत यांनी केला.
यावेळी कार्यक्रमास, डॉ. कुबेर मगदूम, सूर्यकांत बिडकर, सौ. ऋतुजा जोशी, गजानन खेतमर, प्रताप जाधव, वर्षा कुलकर्णी, सौ. लता बडवे, शशिकला नवनाळे, हेमंत कवठे, सर्जेराव घोरपडे, हिमांशू मिरगे, महावीर कुरुंदवाडे, अजित कोईक, सुरेश काजवे, बाळासो देवनाळ, सौ. मनीषा कोष्टी, काशिनाथ जगदाळे, विजय बनसोडे, गजानन शिरगुरे, विजय हावळे, एम. के कांबळे यांचेसह सभासदांची उपस्थिती होती.