इचलकरंजी : विजय मकोटे
दि: १६ इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशन लि., या असोसिएशनच्या सन २०२२-२३ ते सन २०२७-२८ च्या पंचवार्षिक निवडणुकीत अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर १३ जागांसाठी १३ जणांचे अर्ज शिल्लक राहिल्यामुळे पॉवरलुम असोसिएशनची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याची अधिकृत घोषणा आज सहकारी निवडणूक प्राधीकरणाने केलेली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मा.श्री.एस.एस. शिंदे हे काम पाहत आहेत.
नवनिर्वाचीत संचालक मंडळ पुढील प्रमाणे सर्वसाधारण गटामध्ये सतीश कोष्टी, महंमदरफिक खानापूरे, राजगोंडा पाटील, पांडूरंग सोलगे, चंद्रकांत पाटील, किरण पोवार, राजाराम गिरी, सुभाष बलवान, अनुसुचित जाती जमाती गटामध्ये चंद्रकांत भोपळे, इतर मागास गटामध्ये दत्तात्रय टेके, भटक्या विमुक्त जाती जमाती गटामध्ये सोमा वाळकुंजे, महिला राखीव गटामध्ये सौ.महादेवी खोत व श्रीमती हमिदा गोरवाडे याप्रमाणे आहेत.
दि इचलकरंजी पॉवरलुम विव्हर्स को-ऑप. असोसिएशन ही सर्वात जुनी यंत्रमागधारकांची आद्य प्रातिनिधीक संस्था आहे. ही संस्था गेली ७४ वर्षे कारखानदारांच्या हिताचे काम करींत असून यंत्रमाग उद्योगाच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवित आली आहे. त्यामुळे सभासदांनी संस्थेच्या कार्यावर विश्वास ठेऊन ही निवडणूक बिनविरोध केलेली आहे. याबद्दल विद्यमान संचालक मंडळाने सर्व सभासदांचे आभार मानले आहेत व यापुढेही यंत्रमागधारकांच्या हितासाठी प्रयत्नशिल राहू अशी ग्वाही दिली आहे. ही निवडणूक बिनविरोध करणेसाठी मा.कल्लाप्पाण्णा आवाडे दादा, आमदार मा.प्रकाशराव आवाडे, ताराराणी पक्षाचे इचलकरंजी शहराचे अध्यक्ष मा.प्रकाशराव दत्तवाडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.