यड्राव:सलीम माणगावे
दि २६ : संशोधन आणि नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत यड्राव येथील शरव इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांने यश मिळविले आहे. महाविद्यालयातील अनिरुद्ध जरंडीकर याच्या संशोधन प्रकल्पाची ‘अविष्कार २०२७’ या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठीय संशोधन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जानेवारी २०२७ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे होणात्या आंतरराज्य विद्यापीठीय स्तरावरील स्पर्धेत तो आपल्या संशोधन प्रकल्पाचे सादरीकरण करणार आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ, लोणेरे येथे नुकत्याच पार पडलेल्या विद्यापीठस्तरीय ‘अविष्कार’ संशोधन स्पर्धेत ऑटोमेशन अॅड रोबोटिक्स इंजिनिअरिंग विभागाचा विद्यार्थी अनिरुद्ध याने ‘लॉगीट्रॅक उद्योग ४,० आधारित स्मार्ट लॉजिस्टिक व्यवस्थापन प्रणाली हा नाविन्यपूर्ण प्रकल्प सादर केला. या प्रकल्पाने तृतीय क्रमांक पटकावत आंतरराज्य विद्यापीठीय स्तरावरील पुढील स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. या संशोधन प्रकल्पासाठी त्याला प्रा. स्वप्रिल हेरवाडे यांचे मार्गदर्शन लाभले.
वाणिज्य, व्यवस्थापन आणि कायदा या विभागांतून १५० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग नोंवृविला होता. या स्पर्धेत अनिरुद्ध याने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लॉजिस्टिक व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, अचूक आणि स्मार्ट बनविण्याच्या संकल्पनेवर आधारित प्रकल्प सादर केला. उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजा आणि उद्योग ४.० तंत्रज्ञानाची सांगड घालणारा हा प्रकल्प विशेष ठरला.
शरद इंजिनिअरिंगचे विद्यार्थी दरवर्षी या स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करीत असून, अनिरुद्धच्या वधामुळे महाविद्यालयाच्या गंशोधन परंपरेत आणखी भर पडली आहे. या यशासाठी अविष्कारचे महाविद्यालयीन ममन्वयक प्रा. धनची विरादार, डॉ. आशिष देसाई यांच्यासह महाविद्यालयाचे टीन, विभागप्रमुख आणि प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.
या यशाबद्दल मंम्देचे अध्यक्ष आमदार डॉ. राजेंद्र पाटील यट्टावकर आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यानी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक प्राध्यापकांचे अभिनंदन केले. फोटो बओळ : अविष्कार नशोधन स्पर्धेत यश संपादन केल्याबद्दल अनिरुद्ध जरंडीकर याचा सत्कार करताना एक्झिक्युटिव्ह डायरक्टर अनिल वागणे, गमवेत प्राध्यापक व मान्यवर,