संविधानातील मूल्ये प्रत्येकाच्या घरात आणि आचरणात पोहोचावीत : प्रकाश आवाडे

आमदार राहुल आवाडे जनसंपर्क कार्यालयात संविधान दिन उत्साहात; १० हजार संविधान प्रतींचे वाटप करणार

इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.२६:भारतीय संविधान हे देशाच्या लोकशाहीचा आत्मा असून, प्रत्येक नागरिकाने संविधानातील मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांविषयी जागरूक राहून देशाच्या प्रगतीत योगदान द्यावे, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते प्रकाश आवाडे यांनी केले.भारतीय संविधान दिनानिमित्त आमदार राहुल आवाडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रारंभी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान, पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि निष्पाप नागरिकांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी बोलताना प्रकाश आवाडे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला जगातील सर्वोत्कृष्ट संविधान दिले. या संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समानता, स्वातंत्र्य आणि न्यायाचा अधिकार प्राप्त झाला आहे. संविधान दिन केवळ औपचारिकपणे साजरा न करता संविधानातील विचार प्रत्येकाच्या घरात आणि दैनंदिन आचरणात रुजले पाहिजेत. याच उद्देशाने संविधानाच्या प्रतींचे वाटप करण्यात येत असून, जवळपास १० हजार संविधान प्रती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

याप्रसंगी आंबेडकर चळवळीतील राजाभाऊ कांबळे, अविनाश कांबळे, रवी रजपुते आणि अहमद मुजावर यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, त्यांनी देशाला दिलेल्या संविधानाचे महत्त्व, नागरिकांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्ये याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास महापौर उदय धातुंडे, हुपरीचे नगराध्यक्ष मंगलराव माळगे, विठ्ठल चोपडे, सतीश मुळीक, के. के. कांबळे, महादेव कांबळे, विलास खानविलकर, रुबेन आवळे, प्रकाश दत्तवाडे, राजू मगदूम, अविनाश बनगे, विकास कांबळे, विलास कांबळे, प्रमोद बेलेकर, पंकज कांबळे, मधुकर कांबळे (जॉबर), प्रदीप कांबळे, नंदू शिंगे, मिलिंद कुरणे, सुभाष नरदे, दिनकर कांबळे, कुमार कांबळे, बाळासाहेब रणदिवे, स्वप्निल हुपरीकर, सनत भोजकर, धनंजय मगदूम, अमर आठवले, जंबुकुमार देसाई, दादा मोरे, शितल ऐतवडे, सूरज पाटील, के. जी. चौगुले, समीर मुजावर, सुधीर लिगाडे, दीपक चराटे, बाळासाहेब कलागते, नरसिंह पारीक, प्रशांत कांबळे, सौ. सानिका आवाडे-यड्रावकर, सौ. अश्विनी बिरंजे, प्रियंका इंगवले, संगीता नरदे, सपना भिसे, सीमा कमते, मंगल सुर्वे, विद्या लवटे, अर्चना कुडचे, संजय केंगार, नौशाद जावळे, अरुण निंबाळकर यांच्यासह १६ गावांतील विविध क्षेत्रांतील मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सूत्रसंचालन प्रा. शेखर शहा यांनी केले.