डीकेटीईमध्ये संविधान दिन उत्साहात; उद्देशिकेच्या सामूहिक वाचनातून लोकशाही मूल्यांचा जागर

इचलकरंजी: विजय मकोटे 

दि  २६: भारतीय लोकशाहीचा आत्मा आणि राष्ट्राच्या प्रगतीचा मार्गदर्शक असलेल्या भारतीय संविधानाप्रती आदर व्यक्त करण्यासाठी डीकेटीईमध्ये संविधान दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त प्रा. डी. बी. अजगावकर ग्रंथालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यामध्ये प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्ङ्गूर्त सहभाग घेतला.संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेली न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये लोकशाहीची खरी ताकद आहेत. या मूल्यांचे जतन व संवर्धन करण्याबरोबरच नागरिकांचे घटनात्मक अधिकार, कर्तव्ये आणि सामाजिक जबाबदारी याविषयी जागरूकता निर्माण करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. संविधानातील आदर्श केवळ शब्दांपुरते मर्यादित न ठेवता ते आपल्या विचारांत आणि कृतीत उतरविण्याचा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून देण्यात आला. यावेळी संविधाचे वाचन शोभा पाटील यांनी केले. 
सदर कार्यक्रमास डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टी यांचे मार्गदर्शन लाभले तर संचालिका डॉ एल.एस.आडमुठे, उपसंचालक डॉ यु.जे.पाटील सोशल विभागाचे डॉ ए.आर. बलबवान, ए.एस. काडाप्पा यांच्यासवे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.