इंडो किड्सच्या विद्यार्थ्यानी केली कोकण दर्शन पाईटची स्वच्छता

गांधी जयंतीनिमित्त राबवली सहलीतून स्वच्छता अभियान

कबनूर : चंदूलाल फकीर 

दि. १५ स्वातंत्र्यवीर निजामुद्दीन काझी मायनॉरिटी एज्युकेशन सोसायटी कबनूर संचलित इंडो किड्स इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांचे कोकण दर्शन सहलीचे संस्थेने आयोजन 2 ऑक्टोंबर गांधी जयंती दिनी केले होते. महात्मा गांधी जयंती निमित्त शाळेतील 220 विद्यार्थी व शिक्षिका यांनी कोकण पॉईंट या जागेचा परिसर स्वच्छ केला. या जागेवरील प्लास्टिक कचरा रिकाम्या फेकलेल्या प्लास्टिक बाटल्या व इतर कचरा गोळा करून जागेची सफाई केली.
यावेळी माननीय श्री दिग्विजय पाटील वनरक्षक अंबा संजय कांबळे वनपाल मलकापूर तसेच सौ स्वाती मेटे वनरक्षक घोळसवडे उपस्थित होते.
दिग्विजय पाटील यांनी जंगलाचे परिसर स्वच्छ ठेवणे व निसर्गाने दिलेल्या अमूल्य वनराईची जोपासना करणे सर्वांचे काम आहे. जंगलातील वन्यप्राणी पक्षी झाडे यांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे असे सांगितले. श्री प्रमोद माळी सर यांनी जंगलातील विविध वनस्पतींची माहिती व आंबा घाट पावनखिंड या बद्दल बोलाची माहिती सांगितली. संस्थेचे अध्यक्ष श्री एन एन काजी यांनी महात्मा गांधी यांचा शांती व सद्भावना याचा दिलेला संदेश सर्व जगाला फार गरजेचं असून निसर्गाचे रक्षण करणे व स्वच्छता ठेवणे सर्व मानव जातीचे फायद्याचे असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापिका सौ नाझिया नवाब यांनी आभार मानले.
यानंतर जंगल दर्शन श्री अमर विरकर यांनी आयोजन केलेल्या 20 जीप गाड्यातून करण्यात आले. 220 विद्यार्थी व शिक्षक यांना घेऊन जाणारा वीस गाड्यांचा भव्य ताफा पाहण्यासारखा होता.
यावेळी समीरा पीरजादे महेश पारसे स्काऊट लीडर करिष्मा पाथरवट व विद्यार्थी शिक्षक उपस्थित होते.