जयसिंगपुर : विजय धंगेकर
भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा नरेंद्रभाई मोदी यांचा ७१ वा वाढदिवस जयसिंगपूर भाजपाच्या वतीने साजरा करण्यात आला.
वाढदिवस हा सेवा आणि समर्पण हा भाव समोर ठेवुन साजरा करावयाचा असल्याने मंडला च्या वतीने सकाळी प्रथम प्राथमिक आरोग्य केंद्र ,जयसिंगपुर येथे औषधे, गोळ्या व सिरींज चा साठा भेट म्हणुन डॉ मोघे मॅडम यांच्या कडे सुर्पुत करण्यात आला त्यानंतर दुपारच्या सत्रात नगरपरिषदेचे सफाई कर्मचाऱ्यानां हातमोजे व लहान नॅपकीन वाटप करण्यात आले. ह्या कोरोनाच्या काळात मा मोदीजींनी सफाई कामगार व वैद्यकीय सेवक ह्या दोन्ही घटकांच्या बाबत विशेष प्राधान्य दिल्याकारणाने आजचा वाढदिवस ह्या पद्धतीने साजरा करण्यात आला ,मंडल अध्यक्ष रमेश यळगुडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा सेवा आणि समर्पण दिन साजरा करताना मनस्वी आनंद होत आहे असे मनोगत व्यक्त केले ,यावेळी संतोष जाधव ,मिलींद भिडे यानीही आपली मनोगते व्यक्त केली.
या प्रसंगी सरचिटणीस राजेंद्र दाईगडे,माजी मंडल अध्यक्ष मिलिंद भिडे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस संतोष जाधव,उपाध्यक्ष सुनील ताडे,कोषाध्यक्ष विनायक अणेगिरीकर ,हरीश सुर्यवंशी, कुलदीप देशपांडे,युवा मोर्चा अध्यक्ष पंकज गुरव, जिल्हा ओ बी सी कार्यकारिणी सदस्य भीमराव हडपद,रोहित बागडी,संतोष बिराजदार,सुनील घोलप, सुरज रजपूत,नील शिंदे,रणजीत पाटील,अनिकेत माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.