घोडावत विद्यापीठा तर्फे ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी व औषध उपचार

कोल्हापूर :प्रतिनिधी 

दि .२ जानेवारी :संजय घोडावत विद्यापीठाच्या इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर व स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप सेल यांचेकडून आरोग्य मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करण्यात आले . यावेळी ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार आणि वैद्यकीय सल्ला देण्यात आला. 
यावेळी बोलताना समन्वयक प्रा. अजय कोंगे म्हणाले, कि दिवस-रात्र ऊस तोडणी कामगार कष्ट करत असतात. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते . संजय घोडावत विद्यापीठा अंतर्गत एक सामाजिक बांधिलकी म्हणून कामगारांची आरोग्य तपासणी करण्यात आली. आजच्या धावपळीच्या जगात आपले आरोग्य चांगले राहणे क्रमप्राप्त आहे. बैठे काम, वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूड-जंकफूडचे सेवन, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय वेळ जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला हे लक्षात घेऊन आपण नियमित व्यायाम, योग्य आहार आणि वेळोवेळी आरोग्य तपासण्या करणे गरजेचे आहे.  यावेळी डॉ. बिमल तिवडे, डॉ. अर्जुन पाटील, या शिबिराचे आयोजक प्रा. अजय बी. कोंगे, स्कूल ऑफ फार्मसी विभागाचे प्रा. भाग्यश्री घाटे, प्रा. राज गायकवाड विद्यार्थी  विवेक जनाज, वैष्णवी राजपूत, खुशी कट्यार, प्रियंका कित्तुर, साक्षी माने, तिशा अडवाणी, तुषार चुंग, मोहित सबनीस, निखिल अग्रवाल, श्रेया खोत, स्वप्निल कुडाळकर. आरोग्य तपासनी औषध उपचार आणि वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन कामी विशेष सहकार्य केले.
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रोफेसर डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डीन डॉ. उत्तम जाधव, इनोवेशन अँड इंक्युबॅशन सेंटरचे संचालक डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी स्कूल ऑफ फार्मसी विभागाचे डीन डॉ. श्रीनाथ बी यांनी या सामाजिक उप्रमास शुभेच्छा दिल्या.