इचलकरंजी : विजय मकोटे
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेश हाळवणकर व शहराध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष श्री. प्रवीण पाटील यांच्या संकल्पनेतून शहर उपाध्यक्ष श्री हेमंत मनोहर वरुटे यांच्याकडून प्रभाग 19 मधील मंडळांना आरती निरंजन ताट भेटवस्तू देण्यात आली.
शहराचे उपनगराध्यक्ष तथा भाजपा पक्षप्रतोद मा.श्री.तानाजी पोवार यांच्या हस्ते वाटपाचे शुभारंभ करण्यात आले. याप्रसंगी श्री.राजेश राजपुते, सरचिटणीस अरविंद चौगुले, कोल्हापूर जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्षा सौ.अश्विनी कुबडगे, उपाध्यक्ष सुजय पवार, महेश वरुटे, उमेश लाटणे, अक्षय गुरव, अभिजित वरुटे, योगेश कडतारे, किरण वरुटे, नितीन आवळे, प्रदीप वरुटे यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.