हुपरी नगरपरिषदेस 3कोटी 20 लाख रुपये निधी मंजूर

नगराध्यक्ष सौ जयश्री गाट यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्याला यश

हुपरी :आल्लुद्दिन मुल्ला

दि ,३१ :हुपरी नगरपरिषदेस महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान योजनेतून 82,50,000/-,अग्निशामक सेवांचे बळकटीकरण योजनेअंतर्गत 19,01000/-,लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत 2,19,48040/-असा एकूण 32099040/- इतका निधी प्राप्त झाला आहे.

या विविध योजनेतून निधी मिळवण्यासाठी नगराध्यक्षा सौ जयश्री गाट यांनी वेळोवेळी जिल्हा नियोजन समिती तसेच पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता.त्या पाठपुराव्याला यश आले असून या उपलब्ध निधीमधून शहरातील विविध विकास कामे होण्यास मदत होणार आहे. यामध्ये अग्निशामक बळकटीकरण , शहरातील रस्ते यासह विविध विकास कामे होणार आहेत.या कामी खासदार धैर्यशील माने, खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक, मा. आमदार सुरेशरावजी हाळवणकर तसेच नियोजन समिती सदस्य समरजीतसिंहराजे घाटगे,आमदार प्रकाश आवाडे,अशोकराव माने यांचे सहकार्य लाभले. हा निधी आणण्यासाठी युवा नेते अमित गाट यांनी विशेष प्रयत्न केले .