27 फेब्रुवारीला दत्त कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा

शिरोळ – विजय धंगेकर
दि २६ : श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या वतीने सोमवार दि. 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.00 वाजता कारखाना कार्यस्थळावर दत्त मंदिर शेजारी शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन श्री दत्त कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी केले आहे.
मजूर समस्या व ऊस उत्पादन वाढीसाठी ठिबक सिंचनाद्वारे खत पाणी व्यवस्थापन ही काळाची गरज ओळखून कारखाना कार्यस्थळावरती शेतकरी मेळावा आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले.
या मेळाव्याला ऑस्ट्रेलिया व कॅलिफोर्निया येथे खत व पाणी व्यवस्थापन याविषयी अभ्यास दौरा केलेले तसेच नॅशनल ग्रेप रिसर्च सेंटर पुण्याचे संचालक व सल्लागार विभाकर पाटील हे ‘ऊस पिकासाठी ठिबक सिंचनाद्वारे खत व पाणी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन करणार आहेत. तसेच पशुसंवर्धन विभाग चितळे डेअरीचे जनसंपर्क अधिकारी चंद्रशेखर कुलकर्णी यांचे ‘दुग्धव्यवसायातील जनावरांचे व्यवस्थापन’ या विषयावर मार्गदर्शन होणार आहे. तरी शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील यांनी केले आहे. यावेळी मुख्य शेती अधिकारी श्रीशैल हेगाण्णा, ऊस विकास अधिकारी दिलीप जाधव उपस्थित होते.