इचलकरंजी:विजय मकोटे
दि.७ मार्च : ८ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब वतीने ‘आदर्श गृहिणी’ व ‘आदर्श एकत्र कुटुंब’ पुरस्कार प्रदान कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांच्या हस्ते ‘आदर्श एकत्र कुटुंब’ पुरस्काराने संजय महादेव कांबळे, शैलेंद्र शंकरराव सातपुते व अनिल रंगराव पवार या परिवारांना सन्मानित करण्यात आले. तर महात्मा ज्योतिबा फुले या राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने गौरवलेल्या व इचलकरंजी महानगर पालिकेच्या शिक्षण मंडळाच्या उपमुख्याध्यापिका सौ. अलका मुकुंद खोचरे शेलार यांच्या हस्ते सौ. कांचन आप्पासो चौगुले यांना ‘आदर्श गृहिणी पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले.प्रमुख पाहुणे पी. एम. पाटील यांनी, कुटुंब व्यवस्थेला प्रेरणा देणारे व महिलांचा सन्मान करणारे पुरस्कार देऊन भारतीय संस्कृती जपण्याचे कार्य रोटरी प्रोबसने केले आहे. या पुरस्कारामुळे पुरस्कर्त्यांच्या कुटुंबियांना निश्चितचपणे अभिमान वाटेल, त्यांना प्रेरणा मिळेल असे सांगितले. तर सौ. अलका खोचरे-शेलार यांनी, पाश्चात्य संस्कृतीकडे न वळता पाश्चात्य डे न साजरा करता, आपली भारतीय महान संस्कृती जपली पाहिजे. कारण ज्या संस्कृतीमध्ये आपली मुले रोज आपल्या आई-वडिलांना नमस्कार करतात, कुटुंबातील एकमेकांची विचारपूस करतात, त्याठिकाणी रोजच मदर्स डे, फादर्स डे असतो. रोटरी प्रोबसने कुटुंब व्यवस्थेला व आपल्या संस्कृतीला जोपासणारे पुरस्कार देऊन भारतीय संस्कृती जपली असल्याचे सांगितले.
रोटरी प्रोबस क्लब चे संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांनी, संस्थेच्या कार्याचा आढावा घेत भविष्यामध्ये रोटरी प्रोबस अधिक सेवाभावी वृत्तीने जोमाने काम करेल असे सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार गजानन शिरगुरे व सौ. सुधा ढवळे यांनी केला. स्वागत क्लबचे उपाध्यक्ष शिवबसु खोत यांनी तर सुनिल कोष्टी यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रास्ताविकात क्लबच्या अध्यक्षा सौ. प्राजक्ता होगाडे यांनी प्रोबसच्या कामाचा आढावा घेतला. आभार गजानन सुलतानपूरे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रमोदिनी देशमाने यांनी केले. यावेळी क्लबच्या मेंबर निर्मला मोरे, दीपक दत्तवाडे व प्रकाश अनुरे यांचा वाढदिवसानिमित्त पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास, अॅड. विश्वास चुडमुंगे, अॅड. अशोक तांबे, अशोक देगांवकर, सौ. निर्मला मोरे, प्रदीप लडगे, शालिनीताई जगदाळे, रामचंद्र निमणकर, सौ. सुनिता निमणकर, अलका काटकर, प्रकाश दत्तवाडे, अभिजीत सातपुते, प्रकाश केणी, राहुल सातपुते, संतोष पाटील, रंगराव पवार, अनिल पवार, संकेत पवार, डॉ. ए. के. चौगुले, प्रकाश अनुरे, जगदीश कोष्टी, आप्पासाहेब कुडचे, हिमांशु मिरगे, डॉ. प्रकाश पाटील, सूर्यकांत बिडकर, हेमंत कवठे, प्रकाश आकीवाटे, विजय हावळे आदींसह क्लबचे मेंबर व पुरस्कर्त्यांचे कुटुंबीय उपस्थिती होते.