इचलकरंजी:संजय आंबे
दि ९ – शहरातील प्रतिथयश अशा दि इचलकरंजी मर्चंट्स को-ऑप. बँक लि; इचलकरंजी या बँकेची सन २०२३-२०२८ सालची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. नवनिर्वाचित सदस्यांमधून बँकेचे चेअरमन तसेच व्हाईस चेअरमन यांचे निवडीसाठी मा. डॉ. प्रगती अ. बागल, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांचे अध्यक्षतेखाली सभा पार पडली. सदर सभेमध्ये श्री. राजगोंडा रायगोंडा पाटील यांची बँकेच्या चेअरमन पदी एकमताने फेर निवड करणेत आली. तसेच बँकेच्या व्हाईस चेअरमन पदी श्री. गजानन आण्णासो लोंढे यांची एकमताने निवड करणेत आली.
सदर सभेस बँकेचे नवनिर्वाचित ज्येष्ठ सदस्य श्री.विलास गणपती गाताडे, श्री.चंद्रकात देऊ उर्फ दादू बिंदगे, श्री.कमलाकर विठोबा पालनकर, श्री.बाळासाहेब आप्पाण्णा बरगाले, श्री.भूषण चंद्रकांत शहा, श्री.राजेंद्र बंडोपंत शिरगुप्पे, श्री.राजकुमार धन्यकुमार पाटील, श्री.मधुकर महादेव पांढरे, श्री.दशरथ ज्ञानू मोहिते, श्री.व्यंकटेश बाबू शहापूरकर, श्रीमती.शोभा रमेश कडतारे, सौ.विजयश्री प्रकाश गौड व बँकेचे जनरल मॅनेजर श्री.दिपक लक्ष्मण काटकर हे उपस्थित होते.
सदर सभेनंतर बँकेच्या संचालिका श्रीमती.शोभा रमेश कडतारे, सौ.विजयश्री प्रकाश गौड यांचे हस्ते मा. डॉ. प्रगती अ. बागल यांचा तसेच नवनिर्वाचित चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचा सत्कार मा. डॉ. प्रगती अ. बागल, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तालुका उपनिबंधक, सहकारी संस्था, हातकणंगले यांचे हस्ते करणेत आला. शेवटी संस्थापक ज्येष्ठ संचालक श्री. विलास गणपती गाताडे यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थितांचे आभार मानले.