प्रोटोकॉल तोडत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर फडणवीसांच्या बंगल्यावर दाखल

मुंबई:प्रतिनीधी

दि:०३:जुलै:विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे प्रोटोकॉल तोडत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री यांची असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थान येथे शुकशुकाट असून, राष्ट्रवदीचे नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवास्थानी दाखल झाले आहेत. त्यामुळे राजकी चर्चा आणखी जोरात रंगू लागल्या आहेत.

काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार, छगन भुजबळ ही नेतेमंडळी फडणवीसांना भेटण्यासाठी त्यांच्या बंगल्यावर आली होती. यावेली खातेवाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. भाजपकडील असलेले उर्जा, ग्रामविकास आणि सिंचन हे खाते राष्ट्रवादीकडे जाणार असल्याची माहिती आहे

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांचा अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत नार्वेकर हे फडणवीसांच्या बंगल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे. प्रोटोकॉलप्रमाणे फडणवीस व इतर नेत्यांनी विधानसभा अध्यक्षांकडे जाणे क्रमप्राप्त आहे. पण नियम डावलत नार्वेकर हे फडणवीसांच्या घरी दाखल झाले.

 

मंत्रिमंडळ विस्तारात महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्री यांची असते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकिय निवासस्थान येथे शुकशुकाट असून राष्ट्रवदीचे नेते, विधानसभा अध्यक्ष यांची उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यात खलबतं सुरु आहेत.