मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमी कटिबद्ध राहीन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

जयसिंगपूर:प्रतिनिधि

दि:२४:जुलै:जयसिंगपूर शहरातील मुस्लिम समाजाला सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल शहरातील मुस्लिम समाज बांधवांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा केला सन्मान 

जातीपातीचे राजकारण मी कधी केले नाही, करत नाही आणि यापुढेही करणार नाही, मुस्लिम समाजासह शिरोळ तालुक्यातील सर्व समाजातील जनतेने माझ्यावर मोठा विश्वास ठेवून सर्वांनी मला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये अपक्ष असताना देखील मोठ्या मताधिक्याने विजयी केले, शिरोळ तालुक्यातील जनतेने दाखवलेला हा विश्वास मी कदापी विसरणार नाही, प्रत्येक समाजातील सर्वसामान्य घटकाला न्याय देण्याचा माझा प्रयत्न कायम राहील, सर्वांना सोबत घेऊन शिरोळ तालुक्याचा आपल्याला चौफेर विकास करायचा आहे, साडेतीन वर्षाच्या माझ्या कार्यकाळात शिरोळ तालुक्यात जवळपास ८५० कोटी रुपयांचा निधी आणण्या मध्ये सर्वांच्या सहकार्याने मला यश आले आहे, यापुढे देखील अनेक प्रकल्प मार्गी लावायचे आहेत असे उदगार आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी काढले, सत्ता असो अथवा नसो मुस्लिम समाजाने नेहमीच आमच्या परिवाराला साथ दिली आहे,त्यामुळे हा समाज विकासापासून वंचित राहणार नाही यासाठी मी कटीबद्ध राहून काम करेन, अडचणीच्या काळात मुस्लिम समाज बांधवांनी देखील सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून वेळोवेळी मदत केली आहे, कोरोना महामारीच्या काळात मी केलेल्या आवाहनानंतर मुस्लिम समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन सीपीआर हॉस्पिटल कोल्हापूर व आयजीएम हॉस्पिटल इचलकरंजी येथे प्रत्येकी दहा बेडचे आयसीयू सेंटर उभा करून दिले होते, जात धर्म न पाहता समाजातील अनेक युवकांनी पुढे येऊन अनेकांचे अंत्यसंस्कार देखील केले होते याची नोंद नेहमी घेतली जाईल,असेही आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी यावेळी सांगितले,जयसिंगपूर शहर व परिसरातील मुस्लिम समाज बांधवांसाठी विविध उपयोगी मुस्लिम समाज भवन मल्टीपर्पज हॉल उभारण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी महाराष्ट्र शासनाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंजूर करून दिल्या बद्दल जयसिंगपूर शहरातील समस्त मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा भव्य सत्कार शनिवारी संपन्न झाला, वाजंत्री सह फटाक्यांची आतषबाजी करत मुस्लिम समाजबांधव जयसिंगपूर येथील आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात दाखल झाला, शेकडो समाज बांधव यामध्ये सहभागी झाले होते, यावेळी स्वागत व प्रास्ताविक रुस्तुमभाई मुजावर यांनी केले, गेल्या पंचवीस तीस वर्षांमध्ये माजी खासदार कै. बाळासाहेब माने, कै. शामरावआण्णा पाटील यड्रावकर,कै. आप्पासाहेब उर्फ सारे पाटील, कै. देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार, कै.भाई दिनकरराव यादव,कै. सरोजिनीताई खंजिरे, यानी व शिरोळ तालुक्याचे नेतृत्व केलेल्या अनेक लोकप्रतिनिधीनी मुस्लिम समाजाला वेळोवेळी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिलेला आहे,परंतु आजवरच्या इतिहासा मध्ये इतका मोठा आणि भरीव असा निधी मंजूर करून आणण्याचा बहुमान हा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांना जातो, मुस्लिम समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आणि धार्मिक कारणासाठी अनेक अडचणी व गरजा पूर्ण करण्याच्या दृष्टीने मुस्लिम समाजाकडून निधी मागणीसाठीचा प्रस्ताव समाजाने आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांना दिला होता, केवळ वीस दिवसात तातडीने सदरचा निधी आमदार राजेंद्र पाटील साहेबांनी मंजूर करून आणला, केवळ जयसिंगपूर नव्हे कुरुंदवाड येथे मुस्लिम समाज सांस्कृतिक भवनासाठी १.५ दीड कोटीचा निधी तर शिरोळ येथे मुस्लिम समाज बांधवांसाठी ५० लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला आहे, शिरोळ तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये त्यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून दिलेला आहे, जयसिंगपूर हे तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असल्याने आजू बाजूच्या ग्रामीण भागातील समाज बांधवांना देखील याचा लाभ व्हावा असा उद्देश ठेवून हे संकुल उभे राहणार आहे असे रुस्तुमभाई मुजावर यांनी प्रास्ताविकात सांगितले, डॉक्टर रियाज आत्तार व रोहित कानिटकर यांनी मनोगत व्यक्त करताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्याचा गौरव केला, यावेळी जयसिंगपूर जामे मस्जिद ट्रस्ट, मदीना मस्जिद व हिदायत मस्जिद चॅरिटेबल ट्रस्टच्या सर्व संचालकांनी यावेळी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांचा देखील भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी चांद तारा बैतूल माल कमिटी, खिदमत फाउंडेशन,यांनी देखील सत्कार केला यावेळी हाजी सिकंदर शेठ गैबान, बी.सी. फरास, दस्तगीर नंदगावे, शकील गैबान,अख्तरभाई नालबंद ,कबीर गंवडी, म.शफी पटेल,डाॅ अतिक पटेल, फारुखभाई कडबी,सईद पटेल, रमजान मुल्ला, यासीन बागवान, जुबेर बागवान, हाजी मौलासो दर्जी ,गुलाम शेख, डाॅ.रियाज अतार, डॉ. तलहा बागवान, आफताब आतार, अब्दुलगणी नंदगावे, इमाम चटर्जी, हाजी जब्बार मुजावर, इकबाल मुजावर, जुबेर शेख, झाकीर अतार ,तलहा पटेल ,जुबेर शेख, जावेद नंदगावे, मुसा नंदगावे, अबू डांगे, अल्लाबक्ष मुल्ला, शहानुर आत्तार, झाकीर अत्तार, अख्तर नालबंद, इम्तिहाजभाई ओलमाने, उमरअली डांगे ,इकबालभाई इनामदार,इम्रानभाई शेख,युनूसभाई मुल्ला, सोहेल मुजावर,गुलाबभाई मुजावर, माजी नगराध्यक्ष संभाजी मोरे,संजय कलगुटगी, महेश कलकुटगी, माळगे,व असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते आभार माजी नगराध्यक्ष प्रा.अस्लमभाई फरास यानी मानले.