राजापूर:प्रतिनिधि:(प्रमोद तरळ)
दि:२६:जुलै:यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा मार्फत माहे मे / जून २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पत्रकारिता पदविका (Diploma in Journalism) परीक्षेत तहसीलदार कार्यालय राजापूर येथे कोषागार अव्वल कारकून या पदावर कार्यरत असलेल्या मंगेश परांजपे यांनी सुयश संपादन केले आहे.
सदर अभ्यासक्रम पूर्ण करताना परांजपे यांच्याकडे सुमारे ३ ते ६ महिन्याकरिता निवासी नायब तहसीलदर, महसूल नायब तहसीलदार पदांचा अतिरिक्त कार्यभार, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूका तसेच प्रस्तावित बारसू रिफायनरी प्रकल्पाचे विरोधी आंदोलन प्रसंगी कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कामकाज इ. जबाबदा-या होत्या.
सदर जबाबदा-या सांभाळून परांजपे हे विशेष प्राविण्यासह सदर परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.