सांगली:प्रतिनिधि
दि:२९:जुलै: महात्मा गांधी यांच्याबाबत चुकीचे वक्तव्य करणाऱ्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने कठाेर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. ते सांगली येथील कडेगाव येेथे माध्यमांशी बाेलत हाेते
आमदार कदम म्हणाले संभाजी भिडे यांचे वय पाहता वयोमानानुसार अशी वक्तव्य येत आहेत का ? हे देखील पाहिले पाहिजे. महात्मा गांधी यांना देशाने राष्ट्रपिता हा दर्जा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य करणे योग्य नाही.
महात्मा गांधीचं नव्हे तर देशासाठी बलिदान देणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा महापुरुषाबदल कोणीही चुकीचे वक्तव्य करता कमा नये असे मत देखील आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केले.
दरम्यान संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा राज्यभरात आज काॅंग्रेसने निषेध नाेंदविला आहे. युवक काॅंग्रेसने तर भिडे यांच्यावर कारवाई न झाल्यास त्यांना राज्यात फिरु देणार नाही असा इशारा दिला आहे.