इंडियन युनियन मुस्लिम लीगने केले मुंब्रा स्वच्छता विभागाचे घेराव

मुंब्रा:प्रतिनिधि

दि:१०:ऑगस्ट:  इंडियन युनियन मुस्लिम लीग पक्षाने मुंब्रा स्वच्छता विभागाचा घेराव करून  कचरा किती दिवसांत टाकणे बंद होईल हे लेखी देण्यास सांगितले.

तेव्हाच स्वच्छता विभागाचे अधिकारी अभिषेक कन्स्ट्रक्शनचे मोतीराणे जी आणि बापू माक्रे यांनी मुस्लीम लीग पार्टीचे फरहत शेख आणि त्यांच्या टीमला घेऊन नवीन डम्पिंग साईट दाखवली आणि त्यानंतर आठ दिवसांत कचरा टाकण्याचे बंद करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले.