इचलकरंजी:प्रतिनिधि
दि:११:ऑगस्ट: दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांची कोल्हापूर येथे भेट घेऊन नविन वस्त्रोद्योग धोरणामध्ये राहून गेलेल्या बाबींबाबत २७ जून २०२३ इ.रोजीच्या मिटींगमध्ये झालेल्या निर्णयांचा नविन वस्त्रोद्योग धोरणामध्ये समावेश करून ती लागूकरणेबाबचे निवेदन दिले. यासंदर्भात आमदार प्रकाश आवाडे यांनीदेखील मा.वस्त्रोद्योग मंत्री यांना पत्र देवून पाढपुरावा केलेला आहे.
यावेळी अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र राज्याच्या सन २०२३ ते २०२८ साठीच्या नविन वस्त्रोद्योग धोरणामध्ये कांही बाबींची तरतूद करणेची राहून गेली होती. त्यासंदर्भात दिनांक २७/०६/२०२३ रोजी सर्व समावेशक मिटींग वस्त्रोद्योग मंत्रालयामध्ये आयोजित केली होती. त्या मिटींगमध्ये १) २७ एच.पी. खालील यंत्रमागाच्या वीज बिलाच्या बेसीक दरात प्रती युनिट १ रूपये प्रमाणे अतिरिक्त वीज सवलत देणेबाबत. २) २७ एच.पी. ते २१० एच.पी. यंत्रमागांना जाहिर केलेली प्रती युनिट ७५ पैशाची सवलत पूर्वलक्षी प्रभावाने सुरू करणेबाबत. ३) साध्या यंत्रमागांना वित्तीय संस्थांकडून घेतलेल्या सर्व प्रकारच्या कर्जावर ५% व्याज सवलत २०१८ ते २०२३ योजनेतील देणेत यावी. व सन २०२३ ते २८ या योजनेमध्ये सुद्धा त्याचा समावेश असावा. ४) अस्तित्वात असलेल्या यंत्रमाग उद्योगासाठी पुढील दोन वर्षांच्या कालावधीत बंद होणारे वीज अनुदान सुरू ठेवणे व नविन योजनेप्रमाणे सोलर अथवा कॅप्टिव योजनेमध्ये जाणेचा पर्याय ऐच्छिक ठेवणेबाबत. ५) २७ एच.पी. वरील वीज बिलातील पोकळ थकबाकी कमी झाली परंतू त्यावरील व्याज निर्लेखीत झालेले नाही. ते त्वरीत निर्लेखीत करणेबाबत एकमत झाले होते. परंतू अजूनही त्याबाबत निर्णय झालेचे दिसून येत नाही. तरी याबाबींचा नव्या वस्त्रोद्योग धोरणामध्ये लवकरात लवकर समाविष्ट करून त्याचा शासन निर्णय काढून ते लागू करणेबाबत तरतूद करावी असे सांगितले.
यावेळी बोलताना वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांनी अधिवेषन कालावधीत याबाबत मिटींगा घेऊन मसुदा तयार केला आहे. तो लवकरच कॅबिनेट समोर मांडून त्यास मान्यता घेणेत येईल आणि लवकरच यासंदर्भातील शासन निर्णय होईल असे सांगितले. तत्पूर्वी दि इलचकंरजी पॉवरलुम असोसिएशनच्या शिष्टमंडळाने आमदार मा.प्रकाश आवाडे यांची भेट घेऊन झालेला निर्णय लवकरात लवकर लागू करणेविषयी चर्चा केली. यावेळी त्यांनी आधिवेषन काळातच वस्त्रोद्योग मंत्री मा.चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन पत्र देऊन चर्चा केलेली आहे आणि शासन निर्णय लवकरच होईल असे सांगितले.
सदर शिष्टमंडळात दि इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, संचालक दत्तात्रय टेके, किरण पोवार व राजू गिरी यांचा समावेश होता.