पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंदूर येथे कोव्हिड योद्धाचा सन्मान

 

इचलकरंजी :संजय आंबे

देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त चंदूर गावातील कोव्हिड योध्यांचा सन्मान भाजपा शहर अध्यक्ष अनिल डाळ्या यांच्या प्रमुख हस्ते महासिद्ध मंदिर येथे करण्यात आला. यावेळी ग्रामसेवक बाळासो कांबळे, सरचिटणीस अमर कांबळे, बुथ प्रमुख विजय कांबळे ,पोलीस पाटील राहुल वाघमोडे उपस्थित होते.

चंदूर गावातील डॉक्टर, आशा सेविका, पत्रकार, ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, मेडिकल कर्मचारी, शिक्षक-शिक्षिका यांनी कोरोन काळात आपल्या जीवाची पर्वा न करता अमूल्य असे योगदान देऊन सेवा बजावले आहे.अशा कोव्हिड योध्यांचा सन्मान मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त यथोचित सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळ ग्रामपंचायत सदस्य भगवान पुजारी, गाव अध्यक्ष राजकुमार पाटील, डॉ.खाण्णाप्पा पुजारी, काशिनाथ पुजारी, रावसाहेब कदम, शिवाजी पाटील, रामा पुजारी, सौ.आरती कांबळे, मधुकर खटावकर, जगोंड कांबळे, अनिल परिट, शिवा कांबळे, अभिषेक कांबळे, ओंकार कांबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते.सदर कार्यक्रम यशस्वीरित्या करण्यसाठी प्रभाग ६ चे अध्यक्ष,बुथ प्रमुख विजय कांबळे यांनी विशेष प्रयत्न केले.