इचलकरंजी : प्रतिनिधी
दि २: येथील रौप्य महोत्सवी वृत्तपत्र पत्रलेखक संघाच्यावतीने शनिवारी (ता.४) सांयकाळी ६ वाजता शिवाजी विद्यापीठातील इतिहास विभागप्रमुख प्रा.डाॅ. अवनिश पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. `लोकहितवादीची शतपत्रे आणि आजचे वृत्तपत्र पत्रलेखन` हा व्याख्यानाचा विषय आहे. समाजवादी प्रबोधिनीच्या सभागृहात होणा-या या व्याख्यानास जिज्ञासू श्रोत्यांनी उपस्थीत रहावे, असे आवाहन अध्यक्ष पांडुरंग पिसे व सचिव मनोहर जोशी यांनी केले आहे.