डीकेटीईचा महाराष्ट्र राज्य सरकार वस्त्रोद्योग विभाग यांचेशी सामंजस्य करार

इचलकरंजी : कयुम शेख 

दि ०२  डीकेटीईचे टेक्सटाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूट आणि महाराष्ट्र राज्य सरकार वस्त्रोद्योग विभाग यांचेशी,वस्त्रोद्योग व्यवसायास चालना देण्यासाठी आणि विद्यार्थी कल्याणासाठी सामंजस्य करार झाला आहे. मुंबई येथील ताज हॉटेल मध्ये संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्य सरकार आणि कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्यामार्फत आयोजित ‘टेक्सफयुचर२०२३‘ या परिषदेत डीकेटीई चे पदाधिकारी व महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग विभागाचे पदाधिकारी यांच्यात कराराचे आदानप्रदान झाले.
मुंबई येथे संपन्न झालेल्या वस्त्रोद्योग मंत्रालय व कॉन्फीडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री यांच्या संयुक्त विद्यमानाने ‘टेक्सफयुचर २०२३‘ या फयुचर ऑफ टेक्स्टाईल अँण्ड ऍपरल या विषयावर आयोजित परिषदेमध्ये डीकेटीईच्या पदाधिकारी यांना महाराष्ट्र राज्य सरकार कडून आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये सेक्रेटरी टेक्स्टाईल मिनिस्ट्री महाराष्ट्र स्टेट विरेंद्र सिंग व डीकेटीईच्या मानद सचिव डॉ सौ. सपना आवाडे, ट्रस्टी रवी आवाडे, प्र संचालिका प्रा. डॉ. सौ. एल.एस. अडमुठे, डे. डायरेक्टर प्रा. डॉ. यु. जे. पाटील यांच्यामध्ये कराराचे अदानप्रदान झाले. यावेळी केंद्राचे राज्य वस्त्रोद्योग मंत्री दर्शाना जर्दोष, विधानसभेचे स्पीकर राहूल नार्वेकर, डीकेटीईचे उपाध्यक्ष प्रकाश आण्णा आवाडे, रेमंड कंपनीचे चेअरमन गौतम सिंघानिया, ऍडिशनल सचिव वस्त्रोद्योग मंत्रालय रोहित कंसल  यांची उपस्थिती होती.
या कराराअंतर्गत टेक्स्टाईल व टेक्नीकल टेक्स्टाईल पार्क तसेच सौर उर्जा प्रकल्पाचे मुल्यमापन करण्यासाठी डीकेटीईकडुन अवश्यक ते सहाय करण्यात येईल. हा करार ५ वर्षासाठी कार्यरत असून यामध्ये तांत्रिक सदस्यांची नियुक्ती करुन महा-टफस योजनसाठी उपयुक्त यंत्रसामुग्री निवडण्यात विभागाला मदत करणे. इंटीग्रेटेट व सस्टेनेबल टेक्स्टाईल पॉलीसी २०२३ -२०२८ या अंतर्गत स्किम्स डिझाईन करण्यसाठी सहाय करणे, टेक्नीकल टेक्स्टाईल, टेक्स्टाईल केमिस्ट्री, हाय परफॉरम्न्स टेक्स्टाईल, पॉलीमर आणि कंम्पोझिट या विषयामध्ये कौशल्य निर्मिती अभ्यासक्रम तयार करण्यासाठी विभागाला मदत करणे अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
डीकेटीईमधील उपलब्ध अद्यायावत टेक्नॉलॉजीचा लाभ वस्त्रोउद्योगांना होणार असून, डीकेटीईच्या प्राध्यापकांच्याद्वारे राज्यातील वस्त्रोउद्योग वाढीसाठी विविध विषयावर मार्गदर्शन मिळणार आहे. यामुळे राज्यातील वस्त्रोद्योग कार्याचा विस्तार व गुणवत्ता वाढीसाठी देखील फायदा होणार आहे. तसेच या निमित्त ताज हॉटेल मुंबई येथे आयोजित केलेल्या मोजक्या निमंत्रित प्रदर्शानामध्ये डीकेटीईच्या स्टॉलचा सहभाग होता. या स्टॉल ला नामवंत मान्यवरांनी भेटी दिल्या व संस्थेच्या कार्याबददल समाधान व्यक्त केले.
सदर करार संपन्न होण्यासाठी डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे तसेच सर्व पदाधिकारी यांचे मार्गदर्शन लाभले.  या करारासाठी प्रा. डॉ. व्ही.के.ढंगे, डॉ. पी.बी.मलकाने यांनी समन्वयकाचे काम पाहिले.