मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव

राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी 

 दि. 1 :– मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र, राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नयेराज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावीअसे आवाहन आज सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत करण्यात आले. तसेच या सर्व प्रयत्नांना उपोषणकर्ते श्री. मनोज जरांगे पाटील यांनीही सहकार्य करावे व आपले उपोषण मागे घ्यावेअसे आवाहन करणारा ठराव सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

            बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसमाजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारमाजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणमंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटीलचंद्रकांत पाटीलछगन भुजबळदिलीप वळसे-पाटीलगिरीश महाजनदादाजी भुसेविधान परिषदेचे  विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवारविविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री जयंत पाटीलनाना पटोलेसुनील तटकरेअनिल परबसुनील प्रभूआशिष शेलारराजेश टोपेसदाभाऊ खोतजोगेंद्र कवाडेसुलेखा कुंभारेबच्चू कडूशेकापचे जयंत पाटीलराजू पाटीलकपिल पाटीलसदाभाऊ खोतराजेंद्र गवईडॉ.प्रशांत इंगळेकुमार सुशीलबाळकृष्ण लेंगरे आदी उपस्थित होते. याशिवाय मुख्य सचिव मनोज सौनिकमहाधिवक्ता बिरेंद्र सराफसामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगेइतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            या ठरावात पुढे असे म्हटले आहे कीमराठा आरक्षणाविषयी कायदेशीर कार्यवाही  शक्य तितक्या लवकर करण्यात यावी. मात्रत्याला आवश्यक तो वेळ देणे गरजेचे आहेहे आंदोलकांनीही समजून घ्यावे. राज्यामध्ये ज्या हिंसेच्या घटना घडल्या आहेत व घडत आहेत त्या अयोग्य असून आम्ही त्याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त करतो. राज्यात कुणीही कायदा हातात घेऊ नयेराज्यातील शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावीअसे आवाहनही करण्यात आले आहे.