गंगामाईच्या माळी व करंबेळकर यांची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड

इचलकरंजी :प्रतिनिधी 

दि .२ शालेय, शासकीय विभागस्तरीय योगासन स्पर्धा नुकत्याच योगभवन, इचलकरंजी येथे संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये 17 वर्षाखालील मुलींच्या गटात श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूलच्या विद्यार्थिनी शर्वरी माळी इ. 9 वी (ट्रॅडिशनल व आर्टिस्टिक योग प्रकार) व हर्षदा करंबेळकर इ. 10 वी (ट्रॅडिशनल योग प्रकार) यांनी उत्कृष्ट कामगिरी करीत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सलग दुसऱ्या वर्षी जाण्याचा बहुमान मिळवला. अहमदनगर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी त्या लवकरच रवाना होत आहेत.
दोन्ही खेळाडूंना क्रीडा विभाग प्रमुख प्रा. शेखर शहा, क्रीडाशिक्षक डॉ. राहुल कुलकर्णी व श्री सुहास पोवळे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस. गोंदकर, उपमुख्याध्यापिका सौ. एस. एस. भस्मे, उपप्राचार्य श्री आर. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री व्ही. एन. कांबळे, पर्यवेक्षक श्री एस. व्ही. पाटील यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
श्री ना. बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा, चेअरमन श्री कृष्णाजी बोहरा, व्हाईस चेअरमन श्री उदयजी लोखंडे, खजिनदार श्री राजगोपाल डाळ्या, मानद सचिव श्री बाबासाहेब वडिंगे, स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर तसेच संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी व विश्वस्त यांचे खेळाडूंना बहुमोल सहकार्य लाभले.