राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महायुतीची वर्चस्व इचलकरंजी भाजपाच्या वतीने जल्लोष

इचलकरंजी:प्रतिनिधी

दि:०७:नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करून सर्वाधिक ग्रामपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकविला. यावेळी भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहराध्यक्ष पै.अमृत भोसले यांच्या नेतृत्वाखाली विजयोत्सव साजरा करण्यता आला.

महाराष्ट्र राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, शिवसेना महायुतीने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये वर्चस्व प्रस्थापित केले आहे,भारतीय जनता पार्टीने तब्बल ७०० च्या पुढे ग्रामपंचायतीवर सत्ता स्थापन करून राज्यात नंबर १ चा पक्ष बनला आहे. या ग्रामपंचायत निवडणूकमध्ये महाविकास आघाडीला जनतेने पूर्णपणे नाकारले असून पंचायत ते पालर्मेंट विकासभिमुख भाजपा महायुतीला जनतेने कौल दिला आहे असे यावेळी शहराध्यक्ष पै.अमृत भोसले यांनी सांगितले. यावेळी इचलकरंजी भाजपाच्या वतीने शिवतीर्थ येथिल छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे फटाक्यांची आतिषबाजी करून, साखर वाटप करून भारतीय जनता पार्टीचा विजय असोच्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.

यावेळी जिल्हा सरचिटणीस शहाजी भोसले, स. गा. निं. यो.अध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या, वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, युवा मोर्चा अध्यक्ष जयेश बुगड, मा.नगराध्यक्षा सौ.अलका स्वामी, महिला आघाडीच्या सौ.पूनम जाधव, सौ.अश्विनी कुबडगे, सौ.योगिता दाभोळे, सौ.नीता भोसले, सौ.संगीता कांबळे, सौ.संगीता घोरपडे, शबाना शहा, गंगा पाटील, पांडुरंग म्हातुकडे, सतीश पंडित, उमाकांत दाभोळे, मा.जि.पं. सदस्य प्रसाद खोबरे, राजेंद्र पाटील, राजेश रजपुते, प्रदीप मळगे, मा.नगरसेवक युवराज माळी, सचिन माळी, रामसागर पोटे, म्हाळसाकांत कवडे, महेश पाटील, उत्तम विभूते, मनोज तराळ, नामदेव सातपुते, मनोज जाधव, सचिन पवार, राजू भाकरे, राहुल पवार, दिलीप मुथा आदी पदाधिकारी उपस्थित होते.