इचलकरंजी :हबीब शेखदर्जी
दि .११ शहरातील इंजिनिअर,आर्किटेक्ट, डेव्हलपर्स,बिल्डर यांचा मेळावा बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बिरला शक्ती रिजनल सेल्स मॅनेजर निशाद जोशी,सेल्स प्रमोटर नितीन धूत, कोल्हापूर ब्रांच मॅनेजर जयवंत लोखंडे, सांगली ब्रांचं मॅनेजर शादाब शिलेदार,सेल्स ऑफिसर दीपक सावंत,अनिल भंगे,टेक्निकल इन्चार्ज महेश कोले,आर्किटेक्ट अँड इंजिनिअर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक सावंत,बिल्डर्स असोसिएशनचे व्हाइस प्रेसिडेंट फैयाज गैबान,क्रेडाई प्रेसिडेंट मयूर शहा यांची प्रमुख उपस्थिती होती.
महेश कोले यांनी बिरला शक्तीचे नवीन उत्पादन केसोराम सुपर प्लास्ट या सिमेंटचे फायदे व वापर याच्याबद्दल टेक्निकल माहिती दिली.
स्वागत रिजनल सेल्स मॅनेजर निशाद जोशी केले.प्रास्ताविकमध्ये नितीन धूत यांनी आपण सर्वांनी कंपनीला दिलेली साथ व दाखवलेला विश्वास बहुमूल्य असून,येथून पुढच्या काळातही हा विश्वास व आपली साथ कायम ठेवावी व केसोराम सुपर प्लास्ट या नवीन उत्पादक विक्रीस हातभार लावावा असे आवाहन केले.आभार कोल्हापूर ब्रांच मॅनेजर जयवंत लोखंडे यांनी मानले.सदर प्रसंगी इंजिनिअर सुनिल बिद्रे यांचा बिरला शक्ती सिमेंटच्या वतीने वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला.
या कार्यक्रमास 250 हून अधिक इंजिनिअर,आर्किटेक्ट, कॉन्ट्रॅक्टर,बिल्डर्स, डेव्हलपर्स व रेडीमिक्स प्लांट मालक उपस्थित होते.