डीकेटीईस नॅक ए प्लस चा दर्जा मिळाल्याबददल शिवाजी विद्यापीठातर्फेसत्कार

इचलकरंजी:प्रतिनिधी

दि:१९:नोव्हेंबर: शिवाजी विद्यापीठाच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डीकेटीईच्या टेक्स्टाईल अँण्ड इंजिनिअरींग इन्स्टिटयूटला नॅक ए प्लसचा दर्जा मिळाल्याबददल मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ रविंद्र कुलकर्णी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते इन्स्टिटयूटचे प्रभारी संचालिका प्रा.डॉ. सौ. एल.एस.अडमुठे नॅक कोऑर्डिनेटर डॉ व्ही.आर.नाईक यांचा सत्कार करण्यात आला. या सत्कारावेळी प्र. कुलगुरु डॉ. पी.एस.पाटील,रजिस्ट्रार डॉ.व्ही.एन.शिंदे, सीओई डॉ ए.एन.जाधव यांचेसवे डीकेटीईचे डॉ.व्ही.पी.गायकवाड व प्रा. जी.एस. जोशी उपस्थित होते.

शिक्षण क्षेत्रात विद्यार्थी घडत असताना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक गुणवत्ता महत्वाची असते ही गुणवत्ता वर्धिष्णु करणे हा विद्यापीठे व महाविद्यालये यांच्या प्रयत्नांचा सर्वात महत्वाचा भाग आहे. यासाठी अध्ययन व अध्यापन क्षेत्रात सातत्यपूर्ण कार्य अपेक्षित आहे. हे शैक्षणिक कार्य करताना शिक्षणातील गुणवत्ता जोपसाण्यसाठी नॅकचे मुल्यांकन करणे व त्यामध्ये जास्तीत जास्त गुणांनी मानांकन मिळवीणे हे संस्थेच्या व विद्यापीठाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. डीकेटीईने दोनदा नॅक ए प्लस चे मानांकन मिळविले आहे हे कौतुकास्पद आहे. डीकेटीईमध्ये गेली चाळीस वर्षे विद्यार्थी केंद्रित दृष्टी ठेवून तज्ञ व अनुभवी प्राध्यापकांद्वारे हे कार्य केले जाते. त्याचीच परीणीती म्हणून डीकेटीईने नॅकचे ए प्लस दोनदा मानांकन मिळविले आहे. या यशाबद्दल डीकेटीईचा सत्कार करण्यात आला.

संस्थेने मिळवलेल्या यशामध्ये संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आण्णा आवाडे, मानद सचिव डॉ सपना आवाडे व सर्व संचालक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे त्यामुळेच संस्थेने यशोशिखर गाटले आहे अशी भावना यावेळी संस्थेच्या वतीने प्र. संचालिका डॉ एल.एस.आडमुठे यांनी व्यक्त केली.

फोटो ओळ ः डीकेटीई संस्थेने शिवाजी विद्यापीठमध्ये नॅक ए प्लस चे मानांकन प्राप्त केल्याबददल डीकेटीईच्या संचालिका एल.एस.आडमुठे व स्टाफ यांचा सत्कार करताना कुलगुरु डॉ रविंद्र कुलकर्णी, डॉ. डी.टी. शिर्के व इतर मान्यवर.