इस्लामपुर: प्रतिनिधि
दि:३०: नोव्हेंबर: इस्लामपूर उर्दू हायस्कूल मध्ये बोगस संचालक मंडळ व सभासद तयार करून इस्लामपूर येथील उच्चभ्रू ज लोकांनी शाळेमध्ये रक्कम रुपये एक करोड पर्यंत अपहार केल्याचे उघडकीस आले आहे त्या संदर्भात इस्लामपूर येथील कोर्टात आयुब हवालदार ,अबीद मोमीन ,मिनाज दिवाण, निसार पठाण ,बादशाह मुल्ला (सर )आरिफ मुल्ला, शौकत डंगरे ,मुश्ताक जमादार ,मोहसीन मणेर,शकील जमादार ,युनुस मणेर ,अमीर जमादार,शाबुददीन गणीभाई, अबेदा कोतकुंडे,मुनीर पटवेकर ,यांचे विरोधात खटला दाखल होता
त्याचा तपास इस्लामपूर पोलीस करत होते दरम्यान यातील सर्व आरोपी यांनी स्वतःचा गुन्हा कबूल करत समाजासमोर माफी मागत त्यांनी त्यासंदर्भात प्रतिज्ञापत्र करून दिले होते व शाळेत पुन्हा कधीहा प्रत्येक्ष अगर अप्रत्यक्ष हस्तक्षेप करणार नाही व आम्हाला माफ करा अशी विनंती केली होती ती विनंती मुस्लिम समाजांनी मान्य केली होती परंतु यातील आरोपी हे परिस्थिती पाहून रंग बदलणारे ठरले व त्यांनी पुन्हा इस्लामपूर येथील त्यांच्याच राजकीय पक्षाचे कार्यकर्ते श्री इस्माईल पुणेकर यांना पुढे करून पुन्हा शाळेच्या कामात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली त्यामुळे या सर्व उच्चभ्रू लोकांनी उर्दू हायस्कूल बचाव कृती समितीची पुन्हा फसवणूक केली आहे व त्यांचा विश्वासघात केला आहे त्यामुळे त्यांच्यावर दाखल खटला पुन्हा चालू करून त्यांना लवकरात लवकर अटक करावे याबाबतचे निवेदन इस्लामपूर पोलीस निरीक्षक श्री संजय हरगुडे साहेब यांना दिले आहे व इस्लामपूर उर्दू हायस्कूलचे प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आले आहे या राजकीय खेळीमुळे विद्यार्थ्यांचे व पालकांचे अतिशय नुकसान होत आहे. या नुकसानीकडे कोणत्याही व्यक्तीची कोणतेही लक्ष नसून शाळा लवकरात लवकर बंद करावी मुलांचा आयुष्य बरबाद व्हावे हाच हेतू या उच्चभ्रू लोकांचा दिसून येतो.