इचलकरंजी:कयुम शेख
दि .७ :शहरा मध्ये गेले वर्षभर बहुतांश बंद अवस्थेत असलेले बोअर रिपेअरीचे काम आमदार प्रकाश आण्णा आवाडे यांनी स्वखर्चातून सुरू करण्याचा संकल्प केला असून या रिपेअरीचे काम क. आवाडे इचलकरंजी जनता सह बँकेचे चेअरमन स्वप्निलदादा आवाडे यांच्या देखरेखी खाली व माजी उपनगराध्यक्ष बाळासो कलागते, माजी आरोग्य सभापती संजय केंगार, अनिकेत चव्हाण, विजय पाटील, यांच्या सहकार्याने सुरू असून लाखे नगर इचलकरंजी येथे दुरुस्त केलेल्या बोअरचा शुभारंभ स्वप्निलदादा आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला. कायमस्वरूपी पाण्याची सोय केल्यामुळे भागातील महिलांनी समाधान व्यक्त करीत स्वप्निलदादांचा सत्कार करून आभार मानले
यावेळी रवी जावळे, शांताराम लाखे, श्रीपती लाखे, विठ्ठल जावळे, दत्तू जावळे, धनपाल जावळे, अशोक लाखे, संतोष लाखे, श्रीकांत लाखे, विनायक जावळे, दीपक लाखे, अक्षय जावळे, आनंदा लाखे, प्रल्हाद लाखे, महेश लाखे, रोहित जावळे, सिधांन जावळे, नितीन सुर्वे यांच्यासह भागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.