कबनूर : हबीब शेख दर्जी
दि २६ : कबनूर ग्रामपंचचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल श्री सुधीर लिंगाडे यांची महालक्ष्मी ग्रुप ऑफ मिडिया तर्फ्फे अभिनंदन पत्र व शाल पुष्प देवून सत्कार करण्यात आला .
येथील ग्रामपंचायतीच्या झालेल्या चुरशीच्या उपसरपंच निवडणुकीत ताराराणी आघाडी कबनूर चे गट नेते व ग्रामपंचायत सदस्य श्री सुधीर लिंगाडे यांची उपसरपंच पदी निवड झाली होती .महालक्ष्मी ग्रुप ऑफ मिडिया तर्फे त्यांचा येथील मणेरे हायस्कूल येथे संस्थेचे संस्थापक मा.श्री.सुधाकर राव मणेरे व महालक्ष्मी टाइम्स चे समूह संपादक श्री फिरोज शेख यांच्या हस्ते अभिनंदन पत्र ,शाल व पुष्प देवून सत्कार करण्यात आला.यावेळी महालक्ष्मी टाइम्स चे पत्रकार हबीब शेखदर्जी,प्रदीप मस्के ,सलीम माणगावे ,अश्पाक फकीर ,सौ .आंबी ,रवी धनगर उपस्थित होते .