शिरोळ :कयुम शेख
दि .४: शेतकरी कामगार पक्षाचे सर चिटणीस व विद्यमान आमदार भाई जयंत पाटील यांना शेतकरी कामगार पक्षाच्या आशा व गटप्रवर्तक यांच्या प्रलंबित प्रश्न व मानधन आणी दिवाळी बोनस यांच्या बद्दल महाराष्ट्राचॆ मा.आरोग्य मंत्री यांनी निवेदन देऊन सविस्तरपणे चर्चा करण्यात आली .
मा.आरोग्य मंत्री यांनी केलेल्या घोषणेस अनुसरून शासकीय मान्यता (GR) मिळवून आशा व गटप्रवर्तक यांना घोषीत झालेली मानधन वाढ आणी बोनस यांचा लवकरात लवकर लाभ मिळवून देवू . भाई जयंत पाटील यांना मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी व आशा व गटप्रवर्तक यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष हा बांधील आहे आणी जो पर्यत मी विधान भवनात आहे तो पर्यंत कोणत्याही कामगारांचे आणि भगिनीचे नुकसान होऊ देणार नाही असे भेटण्यास गेलेल्या शिष्ट मंडळाला आश्वासन दिले . आशा भगिनिंनो आपली लढाई फक्त मानधन वाढ या पुरती मर्यादित न ठेवता आपली लढाई कायम शासकीय कर्मचारी दर्जा मिळावे असेही म्हणाले शिष्ठ मंडळाचे नेतृत्व डॉ.भाई प्रवीण चौधरी , नेत्रदिपा पाटील, संजीवनी पाटील यांनी केले .राज्यातील आशा व गटप्रवर्तक साठी खुप मोठ्ठी आनंदाची बातमी शेतकरी कामगार पक्षाच्या पाठपुराव्याने सर्वाना मिळणार आहे.