यड्रावच्या शरद इंग्लिश मिडियम स्कूलचे यश

यड्राव : कयुम शेख 

दि .१८ यड्राव येथील शरद इग्लिश मिडियम स्कूलमधील तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावरील स्पोर्ट-डान्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरावरील स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.यामध्ये १४ वर्षाखालिल मुलीमध्ये ओली अट्टम नृत्य प्रकारात व मुले-मुलीमध्ये आराधी नृत्य प्रकारात प्रथम क्रमांक पटकविला आहे. तर १७ वर्षाखालिल प्रकारात मुलीमध्ये दिवली नृत्य प्रकार सादर केला. त्यामध्ये व्दितीय क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. ह्या स्पर्धा जम्मू-काश्मिर येथे होणार आहे.
विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सचिव सौ. स्वरुपा पाटील यड्रावकर, संचालिका सौ. पद्मश्री खंजिरे, सौ.स्फुर्ती पाटील यड्रावकर यांनी अभिनंदन केले. मुख्याध्यापिका कानिज कोतवाल, क्रिडा शिक्षक महेश गवंडी, प्रशिक्षक तुषार पाटील, संध्या पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.