कोल्हापूर :प्रतिनिधी
दि .२: बचत गटांची उत्पादने अंतिम ग्राहकाला विक्रीसाठी ठेवण्यापूर्वी प्रदर्शने व महोत्सव बचत गटांसाठी मूल्यवर्धनाचे काम करतात. आणि यात दरवर्षी वाढ व्हावी तसेच बचत गटांच्या विक्रीसाठी चांगला प्रतिसाद मिळवा असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. बचत गट व उमेद साठी येत्या काळात अधिकचे पाठबळ पालकमंत्री यांच्या सहाय्याने देऊ असेही ते पुढे म्हणाले. कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर या पहिल्याच कार्यक्रमाला उपस्थित राहण्यास मिळाले याचा आनंद झाल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी बचत गट मोहीमेचा इतिहास सांगून पुर्वी आणि आता बचत गटांना अर्थिक सहाय्य मिळण्यासाठी होणारे त्रास याबद्दलची माहिती दिली. याचबरोबर ते म्हणाले, बचत गटांसाठी आणि प्रसिद्धी देणारी माध्यमे यांच्यासाठी सुरु असणा-या पुरस्कारांचे अनुदान शासन स्तरावरून मिळत नाही. जर अर्थिक स्वरूपात अनुदान दिले तर त्यांना प्रोत्साहन मिळेल व अजून या प्रक्रियेला गती येईल. जिल्हयात होणा-या या विभागीय प्रदर्शनातून निश्चितच कोल्हापूर मधून प्रतिसाद मिळेल असे मत त्यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुषमा देसाई यांनी केले तर आभार मनीषा देसाई यांनी मानले.