गडनदी धरण प्रकल्प ते भैरवगड टुरिझम मुळे पंचक्रोशीतील गावाना मिळणार व्यवसायाला संधी.

रत्नागिरी :सचिन पाटोळे 

दि ७ :कोकणाकडे वाढणारा पर्यटकांचा वाढता ओढा लक्षात घेता ,कोकणातील निसर्गसौंदर्य ,पर्यटन स्थळे, कृषी पर्यटन यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय मार्फत ,बॅंक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे.ट्रव्हल्स आणि टुरिझम गाईड प्रशिक्षण या दहा दिवसांच्या प्रशिक्षण नुकताच रत्नागिरी येथे पार पडले . ट्रव्हल्स आणि टुरिझम गाईड या प्रशिक्षानातुन नवीन  २२ टुरिस्ट गाईड उदयास संस्थेमार्फत आणले आहेत .या प्रशिक्षणातून टुरिस्ट गाईड म्हणून सचिन पाटोळे यांनी भैरवगड टुरिझम ची माहिती देणार आहेत .त्यामुळे गडनदी धरण प्रकल्प ते भैरवगड टुरिझम मुळे पंचक्रोशीतील गावाना मिळणार व्यवसायाला संधी मिळणार आहे .

संगमेश्वर तालुक्यातील भैरवगड हे क दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते . याठिकाणी जाण्यासाठी तीन तालुक्यांतील तीन गावातुन मार्ग आहेत.संगमेश्वर तालुक्यातुन रातांबी गावातुन पायवाट आहे, चिपळूण तालुक्यातुन पाते या गावातुन गडावर जाण्यासाठी अर्ध्यापर्यंत पाकाडी व पुढे पाय वाट आहे,तर पाटण तालुक्यातील कोयना हेळवाक मार्गी पाथरपुंज गावातुन कच्चा रस्ता भैरवगडापर्यंत आहे.तेथे पर्यटक ये जा करत असतात परंतु भैरवगडाचा इतिहास जसा आहे तसा कोणाला माहिती नसल्याने अजुन पर्यंत भैरवगड क दर्जामधेच आहे. कोकणाकडे वाढणारा पर्यटकांचा वाढता ओढा लक्षात घेता कोकणातील निसर्गसौंदर्य ,पर्यटन स्थळे, कृषी पर्यटन यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालय मार्फत ,बॅंक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेने पुढाकार घेतला आहे.संस्थे मार्फत घेण्यात आलेल्या ट्रव्हल्स आणि टुरिझम गाईड प्रशिक्षण या दहा दिवसांच्या प्रशिक्षण दरम्यान स्टार स्वयरोजगार संस्थेचे प्रशिक्षक श्री. दर्शन कानसे, श्री.देवेंद्र सांबरे, प्रशिक्षक श्री संजय नाईक,स्वेता नाईक, सौ.संगीता कळसकर, श्री.मकरंद केसरकर,श्री.मिलिंद चाळके यांनी ट्रव्हल्स आणि टुरिझम गाईड या प्रशिक्षानातुन नवीन २२  टुरिस्ट गाईड.उदयास आणले आहेत.
भैरवगड येथे भैरवनाथाचे मंदिर आहे या मंदिराची देखरेख करण्यासाठी सातगाव मंदिर मंडळ आहे.या मंडळाच्या कमीटीवरती संगमेश्वर तालुक्यातील रातांबी,येडगेवाडी.चिपळुन तालुक्यातील,गोवळ,पाते,मंजुत्री.पाटण तालुक्यातील पाथरपुंज, गावडेवाडी या सात गावातील दोन दोन ग्रामस्थ सदस्य म्हणून आहेत.
या सात गावातुन सर्वे करून गावाचा इतिहास कागदावर आणुन तसेच भैरवगडावरील इतिहासाचा शोध लाऊन भैरवगडाचा नकाशा तयार केला जाणार आहे
भैरवगड क दर्जावरून ब दर्जात आणन्यासाठी प्रयत्न करत असताना भैरवगडाच्या पर्यटनाला भर म्हणून गडनदी धरण प्रकल्प व येथील पाच गावे राजीवली, रातांबी, कुटगीरी,पाचांबे, कुचांबे या गावातील इतिहास हि नकाशावर आणला जाणार आहे .येथे टुरिझम साठी भरपूर पर्याय उपलब्ध आहेत मात्र कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचे आहे.
लवकरच गडनदी धरणावरती गोड्या पाण्यातील मच्छी मार संस्था चालु होणार  आहे,त्याच बरोबर येथे बोंटीग चीही व्यवस्था लवकरच सुरू होणार आहे यासाठी मृणाल जुवळे व तुषार बेचावडे हे याठिकाणी विशेष प्रयत्न करत आहेत.पंचक्रोशी मधे चार ठिकाणी होम स्टे लवकरात लवकर चालू होणार आहेत.असे झाल्यास पंचक्रोशीतील महिला बचत गटांना व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनाही हाताला काम मिळणार आहे, इथे महत्वाचे टुरिझम पाॅंईन्ट म्हणजे भैरवगड,गडनदी धरण प्रकल्प, भैरवगड ते माघजन खाडी पर्यंत गडनदी, भैरवगड गडावरती झीप लाईन,छोटे होम स्टे,कुटगीरी व रातांबी येथील देवराई,येथील पाच गावची ग्रामदेवता मंदिर,छोटी हाॅटेल यातुन स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. भैरवगड टुरिझम झाल्यावर त्याचा फायदा मुंबई गोवा हायवे आरवलीतुन,मुरडव, कुंभारखणी,असुर्डे, नांदगाव,येगाव,कुटरे, कुचांबे या गावांनाही त्याचा फायदा होणार आहे.