इचलकरंजी: विजय मकोटे
दि. २० – “इचलकरंजी शहरासाठी सुळकूड पाणी योजनेची अंमलबजावणी त्वरीत करण्यात यावी या मागणीसाठी “आम्ही सावित्रीच्या लेकी” या महिला गटातील श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे, सुषमा साळुंखे व ज्योत्स्ना भिसे या चार महिलांच्या बेमुदत आमरण उपोषणास इचलकरंजी येथील म. गांधी पुतळा चौकामध्ये उपोषण स्थळी अनेक संस्था व संघटना कार्यकर्ते, नागरिक व महिला यांनी भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला आहे.
उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी दलित पॅंथरचे प्रा. अशोक कांबळे, शिवसेना (उबाठा) महादेव गौड व शोभा गोरे, शालेय पोषण आहार संघटनेच्या फरीदा सुतार, राष्ट्रवादी (शपा) प्रियदर्शनी बेडगे, बानुबी पठाण, जनवादी महिला संघटनेच्या अनेक महिला कार्यकर्त्या, नवकार जैन बचत गटाच्या महिला, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष जोतिराम बरगे, बजरंग लोणारी, संभाजीराव खोचरे, अमर आवळे, मच्छिंद्र नगारे, अमोल भाटले, नागेश शेजाळे, मनसेचे पुंडलिकराव जाधव, राष्ट्रवादी (शपा) नेते मदन कारंडे व सहकारी, समाजवादी पार्टीचे जाविद मोमीन, रसूल नवाब व सहकारी, शाहीर विजय जगताप, कृति समितीचे समन्वयक प्रताप होगाडे, अभिजित पटवा, राहुल खंजीरे, सागर चाळके, विकास चौगुले, कॉ. सदा मलाबादे, कॉ. सुनील बारवाडे व शेकडो नागरिक व महिला यांनी उपोषण स्थळी भेट देऊन पाठिंबा व शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. मंजूर योजना अंमलबजावणीमध्ये हेतुपुरस्सर चालढकल होत असल्याबद्दलची नाराजी व असंतोष येणारे सर्व नेते, नागरिक व महिलांनी व्यक्त केली आहे. जनतेमधील या असंतोषाचे रुपांतर उद्रेकामध्ये होईल अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरु झालेली आहे.