कबनूर : सलीम माणगावे
दि १२ :कबनूर येथे श्री महात्मा बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी युवा नेते व माजी उपसरपंच निलेश पाटील हे महात्मा बसवेश्वर यांच्या वेशभूषा सहभाग झाले होते हे या मिरवणुकीचे खास आकर्षण होते.
कबनूर येथे समस्त लिंगायत समाज यांच्या वतीने श्री बसवेश्वर महाराज यांची जयंती मोठ्या मोठ्या उत्साहात व भक्ती भवानी साजरी करण्यात आली. सकाळी आळते येथील श्री आलम प्रभू डोंगरावरून बसव ज्योत लिंगायत समाजाच्या तरुणांच्या कडून आणण्यात आले या बसव ज्योतीचे स्वागत लिंगायत समाजाचे अध्यक्ष श्री अशोक पाटील व समाजातील प्रमुख व्यक्तीने केले
सकाळी येथील महादेव मंदिरामध्ये पूजा करण्यात आली . श्री सतीश पाटील सौ पाटील यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आले. अनिल पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले यानंतर महादेव मंदिर पासून मिरवणुकीची सुरुवात झाली मिरवणुकीत श्री बसवेश्वर महाराज यांची पालखी डोक्यावर कलश घेतलेल्या महिला घोडे बैल जोड्या यांचा समावेश होता गावातील मुख्य मार्गाने मिरवणूक कलेश्वर मंदिरा जवळ आली मिरवणुकी समोर फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर मिरवणूक गावातून मार्गच होत पुन्हा महादेव मंदिरा या ठिकाणी आली यावेळी गावातील ज्येष्ठ नेते पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्री पी एम पाटील डी डी पाटील सुहास पाटील सुधीर पाटील दादा पाटील नितीन पाटील प्रमोद पाटील आदीसह समाजातील महिला व पुरुष मिरवणुकीत मोठ्या संख्येने उपस्थित होते