सीबीएसई निकालात संजय घोडावत स्कुलच्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

अतिग्रे :प्रतिनिधी

दि १४:संजय घोडावत इंटरनॅशनल स्कुलचा सन २०२३-२०२४ चा इयत्ता १० वी चा कालच निकाल जाहीर झाला. गुणानुक्रमे प्रथम तीन पुढीलप्रमाणे
१. गायत्री झांट्ये ९८.१७
२. रोहन पाटील ९७.८३
३ तन्मय मुरचिटे ९७.५०
९० टक्केपेक्षा अधिक गुण १०६ विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. त्याचसोबत अनेक विद्यार्थ्यांना विविध विषयात १०० पैकी १००  गुण प्राप्त झाले. पैकीच्या पैकी गुण प्राप्त विद्यार्थी संख्या व विषय पुढीलप्रमाणे मराठी – ८ विद्यार्थी, हिंदी – १ विद्यार्थी, संस्कृत -४७ विद्यार्थी, गणित- ८ विद्यार्थी, सामाजिक शास्त्र – १ विद्यार्थी, आय टी -१ विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांचे संचालिका प्राचार्या सस्मिता मोहंती, प्राचार्य डॉ एच एम नवीन व उपप्राचार्य अस्कर अली यांनी अभिनंदन व कौतुक केले. अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे अभिनंदन केले.