रत्नागिरी :नियाझ खान
दि ८ जून :एम सी ए सिनिअर वूमन्स एक दिवशीय इन्वहिटेशन लिग क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी संघ विरूद्ध झोरास्ट्रेन संघात आज झालेल्या स्पर्धेत रत्नागिरी संघाने ३३.१ षटकात १४९ धावा काढल्या. या स्पर्धेत रत्नागिरी शहरातील राजिवडा भागात राहणारी महेक फैयाज हुनेरकर हिने १३ चौकार ठोकून ८३ धावा काढल्या आणि सामना जिंकला. उपस्थित सर्व प्रेक्षकांनी तिचे कौतुक केले. ही खेळाडू नक्कीच भावी काळात भारतीय महिला संघात आपले स्थान मिळवील अशी आशा समस्त क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केली.
हुनेरकरला महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे किरण सामंत यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,बिपीन बंदरकर,दिपक देसाई, बल्या कोतवडेकर,बाळू साळवी आणि कोच वृंदावन पवार यांनी मार्गदर्शन केले.वडील फैय्याज हुनेरकर यांनी माझ्या मुलीने माझे स्वप्न सत्यात उतरवले यांचा मला अभिमान असल्याचे सांगितले.या उत्तुंग कामगिरीबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.