इचलकरंजी :येथील नगरपरिषदेने सन 2021-2022 या वर्षातील शहरातील मालमत्ताधारकांना घरफाळा बिले देणेचे काम सुरु केले आहे. शहरातील अनेक मालमत्ताधारकांना नगरपालीकेने दिलेली प्रोव्हीजनल बिले मिळाली असून अनेक मालमत्ताधारकांनी घरफाळा बिलामध्ये आकारणेत आलेल्या ' घनकचरा व्यवस्थापन शुल्क 'बाबत तक्रारींचा सुर सुरु ठेवला आहे
महाराष्ट्र शासनाने 1 जुलै 2019 रोजी शासन निर्णय करुन घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी ,स्वच्छता व आरोग्य उपविधी मंजूर केलेला आहे सदर शासन निर्णयामध्ये घरे व इतर आस्थापणांच्या कचरा संकलाणासाठीचे मासिक दर निश्चित केले आहेत. या संदर्भात इचलकरंजी नगरपरिषदेने सदर उपविधीला दि. 31 डिसेंबर 2019 इ. रोजी मंजूरी दिलेली आहे. सदर उपविधी प्रमाणे व मंजूर केलेल्या ठरावाप्रमाणे तातडीने त्याची अंमलबजावणी सन 2019-20 या आर्थिक वर्षामध्येच होणे आवश्यक होती. तथापी इचलकरंजी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने या बाबतची सविस्तर टिपणी इचलकरंजी नगरपरिषदेच्या कर विभागाकडे दि. 12 ऑक्टोंबर 2020 रोजी दिलेले आहे . परंतू आरोग्य विभागाने सदर टिपणी देणेपुर्वीच सन 2020-21 ची घरफाळा बिले मालमत्ताधारकांना आदा केली होती. त्यामुळे सन 2020-21 मधिल घरफाळा बिलामध्ये नव्याने आकारणेत आलेल्या घनकचरा व्यवस्थापन शुल्कचा आंतरभाव करणेत आलेला नाही. त्यामुळे चालू वर्षाची म्हणजेच सन 2021-22 या आर्थिक वर्षाची घरफाळा बिले आकारत असताना कर विभागाने 1 जुलै 2019 पासूनची घनकचरा व्यवस्थापन शुल्क ची थकबाकी या बिलामध्ये आंतरभूत केलेली आहे. सदर बिलामध्ये 1 जुलै 2019 पासूनची आकारणी केलेने अनेक मालमत्ताधारकांना घरफाळा आकारणी कमी असून सुध्दा पालिकेच्या अंदाधुंद कारभारामुळे यावर्षी दुप्पट पैसे भरणेची वेळ नागरिकांच्या वर आलेली आहे.गेली पावणेदोन वर्षे कोरोनाच्या आजारामुळे शहराची आर्थिक व्यवस्था डबघाईला आलेली आहे. इचलकरंजी शहरामध्ये कामगार वर्गाचे प्रमाण अधिक असून त्यांची आर्थिक परिस्थिती गंभीर झालेेेे आहे अशातच इचलकरंजी जिझीया कर आकरणी केलेने शहर वासीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 1जुलै 2019 पासून आकारणेत आलेले ' घनकचरा व्यवस्थापन शुल्क 'घरफाळा बिलातून कमी करावी मालमत्ताधारकाकडून त्याची वसूली करण्यात येवू नये. त्याच प्रमाणे ज्या आरोग्य विभागातील अधिका-यांनी या संदर्भात कामचुकारपणा व हलगर्जीपणा केलेचे कारणावरून त्यांचेवर योग्य ती कारवाई करणेत यावी. आशी मागणी नगरसेवक शशांक बावचकर यांनी नगराध्यक्षा यांच्या कडे पत्रा द्वारे केली आहे