कुंभार समाज संगमेश्वर तालुका व युवा आघाडी आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न

कडवई : संगमेश्वर तालुका कुंभार समाज व युवा आघाडी आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर संत गोरा कुंभार मंदिर माखजन कुंभारवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थित पार पडले.युवा आघाडी मार्गदर्शक निलेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व संत शिरोमणी गोरोबाकाकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली.

या कार्यक्रमात संगमेश्वर तालुक्यातील कुंभार समाजाच्या इयत्ता दहावी, बारावी,पदवी व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा शैक्षणिक वस्तू व गुलाबपुष्प देवून सत्कार करण्यात आला.या कार्यक्रम प्रसंगी प्रा.मिलिंद कडवईकर यांनी ‘दहावी बारावीनंतर पुढे काय? ‘विषयावर मार्गदर्शन केले तर अमर साळवी यांनी ‘ज्वेलरी क्षेत्रातील संधी’ या विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संगमेश्वर तालुका युवा आघाडी अध्यक्ष प्रथमेश साळवी यांनी युवा आघाडीच्या कार्याचा आढावा घेतला.या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना जिल्हाध्यक्ष सुभाष गुडेकर यांनी संगमेश्वर तालुका कुंभार समाज युवा आघाडीचे कौतुक केले.युवा आघाडीने अल्पावधीतच विविध उपक्रम राबवून भरारी घेतल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जिल्हा सचिव प्रकाशशेठ साळवी म्हणाले की,कोणतीही संघटना चालवताना शिस्त हवी तर फार मोठे काम होऊ शकते. चिपळूण पतसस्थेप्रमाणे संगमेश्वर तालुक्यातील समाजाने भरीव काम करावे.त्यांना लागणारे सर्व सहकार्य देण्याचे वचन त्यांनी दिले. जिल्हा उपाध्यक्ष व संगमेश्वर तालुकाध्यक्ष भाऊ साळवी यांनी युवा आघाडीचे काम पाहून आनंद होत असल्याची भावना व्यक्त केली.आपण लावलेल्या रोपट्याचा वटवृक्ष होताना पाहून त्यांचा उर दाटून आला.

या कार्यक्रमाला संत गोरोबा काका पतसंस्थेचे चेअरमन तुकाराम साळवी,जिल्हा उपाध्यक्ष व तालुकाध्यक्ष सुनिल साळवी,गुहागर संपर्क प्रमुख नाना पालकर,जिल्हा युवा अध्यक्ष महेश पडवेकर,चिपळूण उपाध्यक्ष रविशेठ साळवी,प्रकाश महाराज निवळकर,खजिनदार जनार्दन मालवणकर,सचिव अमोल पिरदनकर,बबन शेठ पडवेकर,सुनिलभाऊ पडवेकर,सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष रविंद्र शिरकर,कोंकण युवा उपाध्यक्ष प्रदिप शिरकर,युवा नेता उमेश खैर,युवा सचिव सुधीर जामसूतकर,कार्याध्यक्ष पंढरीनाथ मायशेट्ये,संकेत कुंभार,महेंद्र कुंभार,दिगंबर पालकर,माखजन माजी सरपंच सतिश कुंभार,प्रतिक साळवी,तुषार साळवी,गणेश साळवी,प्रशांत टेरवकर,विनोद सावरटकर,प्रमोद गवंडी,सचिव प्रणय कुंभार व संगमेश्वर तालुक्यातील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश कुंभार यांनी केले.त्यानंतर आभार प्रदर्शनाने सभेची सांगता झाली.

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.