श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .२५” श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १९ फेब्रुवारी २०२५ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक मा. श्री. सुधाकररावजी मणेरे, संस्थेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केटकाळे, ट्रस्टीज मा. श्री. शितलकुमार मणेरे, मा. श्री. अनिलकुमार मणेरे, तसेच संस्थेचे समन्वयक मा. श्री. अशोक वसगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री. सुधाकररावजी मणेरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले आणि उपस्थितांना त्यांच्या शिकवणींमधून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडे, कविता, भाषणे तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून त्यांचे पराक्रम आणि आदर्श उजळून टाकले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शर्मिला माळी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीम. दीपा जोलापूरे यांनी मानले.
यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा ऐनापूरे, उपमुख्याध्यापिका सौ. शर्मिला माळी, कॉलेज प्राचार्या सौ. वैशाली मंगसुळे, बालवाडी विभाग प्रमुख सौ. स्वाती ढेकळे, कुसुम ऑलिम्पियाड विभाग प्रमुख श्री. शैलेश कांबळे, कॉलेज विभाग प्रमुख सौ. दीपाली चौगुले, तसेच सर्व विद्यार्थी, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उत्सवमयी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांना शिवचरित्राची प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या राष्ट्रभक्तीला बळ मिळाले.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.