घरगुती त्रासाला कंटाळून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न; आपत्ती व्यवस्थापनाच्या सतर्कतेमुळे जीव वाचला
इचलकरंजी –हबीब शेख दर्जी
दिनांक ४ जुलै २०२५ :आज शुक्रवारी सकाळी १०:३० वाजता पंचगंगा नदीत एका महिलेने घरगुती त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली.
सदर महिला अंजली संजय वायदंडे (वय ५०, रा. लालनगर, इचलकरंजी) या पाण्यात उडी मारून जीवन संपविण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, इचलकरंजी महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या वेळीच केलेल्या प्रयत्नामुळे महिलेचा जीव वाचवण्यात यश आले.
महिला बचावल्यानंतर त्यांना मुलगा संदीप संजय वायदंडे यांच्या ताब्यात सुरक्षितपणे सोपवण्यात आले.
राहत कार्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेचे संजय कांबळे, आकाश आवळे, राहुल पोळ, देवानंद कांबळे, शाक्यानंद कांबळे, विकी जगताप, शितल जोती, आकाश सनदी, सुरेश वाघमारे, करण माळगे, अजित कांबळे यांनी पुढाकार घेतला.
यासोबतच पोलीस बॉय असोसिएशन चे रमाकांत साळी, सुरज पाटील आणि गोपाल माने हे देखील उपस्थित होते. सर्वांच्या तत्परतेमुळे एक अनर्थ टळला.
महिलेला समजावून तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले असून पुढील कार्यवाही पोलिसांकडून सुरू आहे.
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.